Xiaomi इंडिया वर लिस्ट झाला नवीन फोन Redmi 8A Pro, लवकरच होईल लॉन्च

Xiaomi ने या आठवड्यात भारतीय बाजारात आपल्या परंपरेनुसार एक नवीन स्मार्टफोन Redmi 8A लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आला आहे जो स्वस्तात शानदार स्पेसिफिकेशन्स देतो. Redmi 8A च्या लॉन्च मध्ये Xiaomi इंडिया हेड मनु कुमार जैन यांच्या लाईव स्ट्रीमिंग मध्ये Redmi 8 स्मार्टफोनची पण झलक दाखवण्यात आली होती. या वीडियो मध्ये Redmi 8 टीज केल्यानंतर कंफर्म झाले होते कि कंपनी अजून एक फोन Redmi 8 नावाने लवकरच लॉन्च करेल. पण आज Xiaomi वेबसाइट वर या सीरीजचा अजून एक डिवाईस Redmi 8A Pro नावाने समोर आला आहे.

Redmi 8A Pro Xiaomi India च्या वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर बनलेल्या ‘RF EXPOSURE’ सेक्शन मध्ये Redmi च्या सर्व स्मार्टफोन्सची लिस्ट आहे ज्यात या स्मार्टफोन मध्ये असणारी ‘SAR वॅल्यू’ ची माहिती देण्यात आली आहे. या लिस्ट मध्ये Redmi 8A स्मार्टफोन च्या नावाचा पण समावेश आहे आणि या फोन नंतर नाव Redmi 8A Pro चे आहे. या लिस्टिंगने असे निश्चित झाले आहे कि Xiaomi Redmi 8A Pro नावाने आगामी फोन लॉन्च करेल. असे पण म्हणता येईल कि मनु जैन यांनी दाखवलेला फोन Redmi 8 आणि Redmi 8A Pro एकच आहेत.

Redmi 8

Redmi 8 नावाने जे लीक्स समोर येत आहेत त्यानुसार हा डिवाईस ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळू शकतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर सादर केला जाईल ज्यात 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट दिला जाऊ शकतो. लीक नुसार Xiaomi Redmi 8 मध्ये 4 जीबी रॅम मेमरी सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. आशा आहे कि Xiaomi येत्या 1 ऑक्टोबरला चीन मध्ये Redmi 8 सादर करेल. Redmi 8A Pro च्या इंडिया लॉन्चची माहिती पण लवकरच दिली जाईल.

Redmi 8A

Xiaomi ने Redmi 8A द्वारे आपल्या स्वस्त स्मार्टफोन्सचा लुक बदलला आहे. Redmi 8A 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन स्प्लॅशप्रूफ आहे तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी Redmi 8A कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Xiaomi Redmi 8A एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर लॉन्च झाला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या स्मार्टफोन मध्ये एड्रेनो 505 जीपीयू आहे.

Xiaomi द्वारा Redmi 8A दोन वेरिएंट्स मध्ये मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. Redmi 8A फोटोग्राफी साठी सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Redmi 8A मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi 8A डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये सिक्योरिटी आणि अनलॉकिंग साठी फेस रेक्ग्नेशन फीचर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी Redmi 8A मध्ये यूएसबपी टाईप-सी पोर्ट सह 18वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे. किंमत पाहता Xiaomi ने Redmi 8A चा 2जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच फोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here