फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Realme चा हा गेमिंग फोन, यात आहे 6000 mAh बॅटरी आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले

गेल्यावर्षी लॉकडाउन मध्ये Realme ने आपल्या नवीन सीरीज Narzo ची सुरुवात केली होती आणि पहिला मॉडेल Narzo 10 सादर केला होता. आज कंपनीने या सीरीजमध्ये तिसरा वर्जन Realme Narzo 30A सादर केला आहे. कंपनीने दोन मॉडेल Narzo 30A आणि Narzo 30 Pro लॉन्च केले आहेत. या फोन्ससह कंपनीने बजेट आणि मिड सेग्मेंट अजून मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय बाजारात नार्जो 30ए (Narzo 30A) ची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होत आहे तर नार्जो 30 प्रो (Narzo 30 Pro) ची प्राइस 16,999 रुपयांपासून सुरु होत आहे. पुढे आम्ही Realme Narzo बाबत सविस्तर माहिती दिली आहे.

डिजाइन आणि डिस्प्ले

Realme Narzo 30A एक बजेट फोन आहे, त्यामुळे कंपनीने हा पॉलिकार्बोनेट कंस्ट्रक्शनसह सादर केला आहे. क्वालिटी चांगली आहे आणि मागे असलेली टेक्सचर्ड स्ट्रीम डिजाइन तुम्हाला आवडेल. चांगली बाब अशी कि हा फोन हातातून सरकणार नाही. कंपनीने हा फोन Laser Black आणि Laser Blue रंगात सादर केला आहे. फोनच्या मागे चौकोनी कॅमेरा आणि त्याखाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

डिस्प्लेबद्दल बोलायचे तर फोन मध्ये 6.5-इंचाची मोठी स्क्रीन आणि कंपनीने 720 x 1600 पिक्सल रेजल्यूशनच्या LCD पॅनलचा उपयोग केला आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे. तसेच डिस्प्ले 269 पीपीआईला सपोर्ट करतो आणि याची पीक ब्राइटनेस लेवल 570 nits आहे.

हे देखील वाचा : गीकबेंचवर लिस्ट झाला Redmi K40, पावरफुल प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च

प्रोसेसर

Realme Narzo 30A MediaTek Helio G85 चिपसेटवर सादर केला गेला आहे. हा एक गेमिंग प्रोसेसर आहे आणि याद्वारे कंपनीने 10 हजार रुपयांच्याखाली गेमिंग फोनची सुरुवात केली आहे. फोन मध्ये 12nm फॅब्रिकेशन असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे आणि हा 2.0GHz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. कंपनीने हा 3 GB RAM आणि 32 GB मेमरी व्यतिरिक्त 4 GB RAM आणि 64 GB मेमरीमध्ये सादर केला आहे. फोनमध्ये डेडिकेडेट मेमरी कार्डला सपोर्ट आहे.

कॅमेरा

डिस्प्ले आणि प्रोसेसरनंतर कॅमेऱ्याकडे वळायचे झाले तर हा डुअल कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे. फोनचा मेन कॅमेरा 13 MP चा आहे ज्यात F/2.2 अपर्चरचा वापर केला गेला आहे. तसेच यात PDAF सपोर्ट पण मिळेल. सोबत दुसरा सेंसर ब्लॅक अँड व्हाइट आहे. फोनमध्ये HDR सपोर्ट व्यतिरिक्त पोर्टेट मोड पण आहे. सेल्फी बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात 8 MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा AI सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : लॉन्चच्याआधी समोर आले OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E चे सर्व स्पेसिफिकेशन्स, लवकरच येत आहे हा पावरफुल फोन

बॅटरी

रियलमी नारजो 30ए मध्ये तुम्हाला मोठी बॅटरी मिळेल. हा फोन 6,000 mAh ची बॅटरीसह येतो. तसेच यात 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे कि हा फोन 52 तास लागोपाठ फोन कॉल, 114 तास स्पॉटिफाय म्यूजिक, 10 तास गेम आणि 27 तास यूट्यूब व्हिडीओ स्ट्रीमिंग करू शकतो. चांगली बाब अशी कि यात रिवर्स चार्जिंग सपोर्ट आहे.

नेटवर्क

डुअल सिम आधारित या फोनमध्ये दोन 4G सिमचा वापर करता येईल. तसेच वायफाय आणि ब्लूटूथ पण देण्यात आली आहे.

प्राइस

Realme Narzo 30A च्या 3 GB RAM आणि 32 GB मेमरीच्या मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे. तसेच 4 GB RAM आणि 64 GB मेमरी मॉडेल 9,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here