Realme GT Neo 5 चे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या माहिती

Realme आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT Neo 5 चीनमध्ये लाँच करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी Realme GT Neo 5 स्मार्टफोनचे रेंडर ऑनलाइन लीक झाले होते. त्यामुळे हा फोन कसा दिसेल याची माहिती नेटकऱ्यांना मिळाली आहे. तसेच आता कंपनी आपल्या आगामी जीटी नियो स्मार्टफोनचा लाँच टीज करत आहे. आज Realme GT Neo 5 चे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. ही माहिती विश्वासू सोर्सकडून मिळाली आहे, ज्यात डिस्प्ले, कॅमेरा, चिपसेट आणि बॅटरीच्या डिटेल्सचा समावेश आहे.

Realme GT Neo 5 चे लीक स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 5 स्मार्टफोनचे रेंडर्स काही दिवसांपूर्वी लीक झाले होते. या रेंडर्समधून या हँडसेटच्या बॅक पॅनलची डिजाईन दिसली आहे. त्यानुसार हा फोन ड्युअल टोन डिजाईनसह सादर केला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर वरच्या बाजूला एका चौकोनी कॅमेरा मोड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, जोडीला एलईडी फ्लॅश मिळेल. हा फोन कर्व एजसह लाँच होऊ शकतो हे रेंडरवरून स्पष्ट झालं आहे. तसेच फोनच्या उजवीकडे पवार बटन दिसत आहे, त्यामुळे व्हॉल्युम रॉकर डावीकडे मिळू शकतो. हे देखील वाचा: नव्या फोनची चाहूल लागताच OnePlus 10 Pro वर मोठा डिस्काउंट; स्टॉक संपण्याआधी करा बुक

प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं रियलमीच्या आगामी स्मार्टफोनची माहिती दिली आहे. त्यानुसार, Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो, जो 2,772×1,240 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा 1.5K ओएलईडी डिस्प्ले असू शकतो आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. प्रोसेसिंगसाठी Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. जोडीला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज दिली जाऊ शकते.

Realme GT Neo 5 मध्ये Android 13 आधारित रियलमी युआय 4.0 ची स्किन मिळू शकते. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतोRealme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा माक्रो कॅमेरा मिळू शकतो. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही. हे देखील वाचा: 999 रुपयांमध्ये कुटुंबातील 4 माणसांचा रिचार्ज; अनलिमिटेड कॉलिंग व डेटा असलेला Airtel चा भन्नाट प्लॅन

Realme GT Neo 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह लाँच होऊ शकतो. यातील एका मॉडेलमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल जो 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 4,600mAh ची छोटी बॅटरी मिळेल परंतु हा व्हेरिएंट 240W च्या दणकट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, त्यामुळे काही मिनिटांतच हा हँडसेट फुलचार्ज होऊ शकते. हा डिवाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल आणि यात एक प्लास्टिक फ्रेम दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here