3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme 9 Pro+ 5G उपलब्ध; जुना फोन दिल्यास मिळेल 17 हजारांची सूट

Realme च्या एका दमदार 5G डिवाइसवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि realme.com वर ग्राहक नवीन किंमतीत हा स्मार्टफोन विकत घेता येईल. कंपनीनं Realme 9 Pro+ 5G स्मार्टफोनवर बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर आणि आणखी आकर्षक ऑफर्स देखील सादर केल्या आहेत. Realme चा हा हँडसेट काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सादर झाला होता. ग्राहकांकडून देखील या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फ्लिपकार्टवर या फोनला चांगलं रेटिंग मिळालं आहे. जर तुम्ही दमदार 5G डिवाइस विकत घेण्याची योजना बनवत असाल तर Realme 9 Pro+ 5G तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.

Realme 9 Pro+ 5G वरील ऑफर्स

लाँचच्या वेळी या Realme डिवाइसची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली होती. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. परंतु सध्या ऑफर अंतर्गत हा हँडसेट 3,000 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हा फोन आता 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: 1-2 नव्हे तर ‘हे’ पाच फोन्स देत आहेत 20 हजारांच्या बजेटमध्ये 108MP चा शानदार कॅमेरा, पाहा यादी

बँक ऑफर अंतगर्त एसबीआय क्रेडिट कार्डच्या मदतीने फोन घेतल्यास तुम्हाला 10 टक्के डिस्काउंट मिळेल. तर एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रँजॅक्शनवर देखील 10 टक्क्यांची सूट मिळत आहे. टक्के का डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्ही Realme 9 Pro+ 5G च्या खरेदीवर 17,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.

Realme 9 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 6.4 इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेश्योला सपोर्ट करतो. फोनमध्ये Mediatek Dimensity 920 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. जोडीला ग्राफिक्ससाठी ARM Mali-G68 MC4 GPU मिळतो. डिवाइसमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G फोन! 6GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9i 5G ची भारतात एंट्री; इतकी आहे किंमत

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8 मेगापिक्सलची वाइड अँगल कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआयवर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here