135 किलोमीटर रेंजसह PURE EV ecoDryft इलेक्ट्रिक बाईक भारतात सादर; किंमत मात्र गुलदस्त्यात

हैदराबाद मधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी PURE EV नं भारतात आपली नवी इलेक्ट्रिक electric bike सादर केली आहे. या इलेक्ट्रिक मोटारसायकलला कंपनीनं EcoDryft असं नाव दिलं आहे, ही बाइक सिंगल चार्जवर 135km ची रेंज देते, असं सांगण्यात आलं आहे, ही दमदार रेंज पाहून ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या इस बाइकसाठी टेस्ट राइड देखील सुरु झाली आहे. चला जाणून घेऊया PURE EV ecoDryft ची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्स.

Electric Motorcycle EcoDryft Price

प्राइस बद्दल बोलायचं तर कंपनीनं या नव्या इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत मात्र सांगितली नाही. परंतु कंपनी ही बाइक खूप आकर्षक किंमतीत सादर करू शकते. तसेच ही किंमत जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात जगासमोर ठेवली जाईल. हे बाइक बाजारात खरेदीसाठी कधी उपलब्ध होईल याची माहिती देखील पुढील महिन्यात मिळू शकते. आतापर्यंत कंपनीकडे संपूर्ण भारतात 100 पेक्षा जास्त डीलरशिप आहेत. सध्या कंपनी आपलं सेल्स आणि आफ्टर-सेल्स सर्व्हिस नेटवर्क अपग्रेड करत आहे. हे देखील वाचा: रेडमीला हद्दपार करण्यासाठी आणखी एक डाव; 8GB RAM सह स्वस्तात Realme 10s 5G लाँच

PURE EV ecoDryft ची डिजाइन

PURE EV च्या या इलेक्ट्रिक बाइकची डिजाइन पाहता, EcoDryft बेसिक कम्यूटर मोटरसायकल सारखी दिसते. यात अँगुलर हेडलॅम्प, फाइव-स्पोक अलॉय व्हील, सिंगल-पीस सीट इत्यादी देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड अशा चार कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल.

PURE EV ecoDryft ची रेंज

PURE EV नुसार, ecoDryft इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 3.0 kWh बॅटरी पॅक आहे, जो AIS 156 सर्टिफाइड आहे. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्ज केल्यावर ही बाइक 135 km ची राइडिंग रेंज देऊ शकते. अद्याप यातील इलेक्ट्रिक मोटरचे स्पेसिफिकेशन समोर आले नाहीत. परंतु दावा केला जात आहे की या बाइकचा टॉप स्पीड ताशी 75 km आहे. हे देखील वाचा: दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N2 Flip लाँच; सॅमसंगचं साम्राज्य संपवण्यासाठी फोल्डेबल Find N2 ची एंट्री

प्योर ईव्ही स्टार्टअपचे को-फाउंडर आणि सीईओ रोहित वडेरा यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला परफॉर्मन्स मोटरसायकल eTryst 350 बद्दल लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता नवीन इकोड्रिफ्ट लाँच कंपनीच्या विकासात मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका बजावेल. या लाँचमुळे आता आम्ही भारतातील एकवमेव EV2W कंपनी बनलो आहोत, ज्यांच्याकडे स्कूटर आणि मोटरसायकल प्रोडक्टची मोठी यादी आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here