PUBG मोबाईल भारतात येऊ शकतो परत, कंपनीने घेतला मोठा निर्णय

PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite गेल्या आठवड्यात भारत सरकारने सुरक्षेच्या कारणामुळे बॅन केले होते. विशेष म्हणजे अजूनही भारतात पबजीचे पीएस 4, एक्सबॉक्स आणि पीसी वर्जन चालू आहेत. आता समोर येत असलेल्या बातमीनुसार पबजी मोबाईल गेम लवकरच गूगल प्ले स्टोर आणि ऍप्पल ऍप स्टोर वर कमबॅक करू शकतो. दक्षिण कोरिया मधील PUBG कॉर्पोरेशनने एक प्रेस नोट मध्ये सांगितले आहे कि “आम्ही भारतात बॅन झाल्यानंतर PUBG MOBILE नॉर्डिक मॅप : Livik आणि PUBG MOBILE Lite: च्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.”

कंपनीने म्हटले आहे कि त्यांनी आता PUBG मोबाईल फ्रेंचाइजी भारतात चीन मधील टेनसेंट गेम्सच्या अंतर्गत न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. PUBG कॉर्पोरेशनची योजना भारतात सर्व पब्लिशिंगची स्वतःकडे जबाबदारी घेण्याची आहे. यामुळे भारतात पबजीच्या कमबॅकच्या चर्चेला उधाण आले आहे.

सरकारने 2 सप्टेंबरला ज्या 118 चीनी ऍप्स वर बॅन लावला होता त्यात पबजी मोबाईलचा पण समावेश होता. हे सर्व ऍप्स एंडरॉयड आणि आईओएस प्लॅटफॉर्म वर उपलब्ध होते. यामुळे गेमचा पीसी किंवा कंसोल वर्जन बॅन नाही झाला.

PUBG बॅनमुळे केली आत्महत्या

अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःला फासी लावून आत्महत्या केली आहे कारण तो भारतात PUBG Mobileच्या बॅनमुळे खूप दुखी होता. या युवकाचे वय 21 वर्ष सांगण्यात आले आहे, तो एक विद्यार्थी होता.

मीडिया रिपोर्टनुसार प्रीतम हलदर नावाचा तरुण पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. बातमीनुसार 4 सप्टेंबरच्या सकाळी नाश्ता केल्यानंतर प्रीतम आपल्या खोलीतच होता, जेव्हा दुपारी जेवणासाठी त्याच्या आईने त्याला बोलावले तेव्हा रूमचा दरवाजा बंद होता आणि आतून कोणताही आवाज येत नव्हता. घाबरलेल्या आईने शेजाऱ्यांना बोलावले आणि लोकांनी मिळून दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यावर जेव्हा लोक आत गेले तेव्हा त्यांनी प्रीतमचे शरीर पंख्याला लटकत असल्याचे पहिले होते.

TikTok समवेत या 59 चायनीज ऍप्स वर आधीच आहे बॅन

जूनच्या शेवटी बॅन झालेल्या 59 चिनी ऍप्सच्या यादीत TikTok व्यतिरिक्त BigoLive आणि WeChat सह Truecaller, Zoom and Vigo Video ऍप्सचा समावेश आहे. हे चीनी ऍप्स फक्त इंटरटेनमेंट कॅटेगरी मध्ये नाहीत तर यात चॅट ऍप्स, टूल ऍप्स आणि काही गेम्सचा पण समावेश आहे. इथे क्लिक करून बघा भारतात बॅन झालेल्या चीनच्या 200 ऍपची यादी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here