Home बातम्या कौन बनेगा करोड़पति मध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारला प्रश्न, PUBG चा फुल फॉर्म काय?

कौन बनेगा करोड़पति मध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारला प्रश्न, PUBG चा फुल फॉर्म काय?

PUBG भारतातील नंबर वन ऑनलाइन गेम बनला आहे. फक्त लहान मुलं नव्हे तर तरुण आणि पुरुष मंडळी पण या गेमचे चाहते आहेत. कॉलेज असो वा ऑफिस प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी PUBG खेळताना दिसतोच. पण जर तुम्हाला विचारले कि PUBG की फुलफॉर्म काय, तर तुम्ही सांगू शकाल का? हा प्रश्न इतका मोठा झाला आहे कि बॉलीवुडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी भारतातील सर्वात मोठ्या गेम शो ‘कौन बनेगा करोड़पति’ च्या मंचावर हा प्रश्न विचारला आहे. आणि त्यानंतर जे झाले ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

कौन बनेगा करोड़पति अनेक वर्षांपासून टीव्हीवर लोकांचे मनोरंजन करत आहे. फक्त या शो चा कॉन्सेप्टच नाही तर याचे सूत्रसंचालक बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांचे वेड लोकांना KBC बघण्यास भाग पडते. KBC च्या या सीजन मध्ये PUBG संबंधित प्रश्न विचारला गेला. गेल्या सोमवारी टेलीकॉस्ट झालेल्या KBC च्या भागात विवेक भगत नावाच्या स्पर्धकाला बच्चन यांनी PUBG चा फुलफॉर्म विचारला.

जे लोक PUBG चे चाहते आहेत ते कदाचित याचे उत्तर देऊ शकतील पण विवेकला या प्रश्नाने गोंधळात टाकले. विवेकला याचे उत्तर माहित नव्हते आणि त्याने लाइफलाईन वापरून ‘ऑडियंस पोल’ ची निवड केली. हैराणीची बाब म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर विवेकला आले नाही त्याचे उत्तर ऑडियंस पोल अंतर्गत 61 टक्के लोकांनी बरोबर दिले. आणि योग्य उत्तर होते PlayerUnknown’s Battlegrounds!

विशेष म्हणजे PUBG MOBILE जगातील सर्वात जास्त पैसे कमावणारा ऑनलाइन गेम बनला आहे, जो अजूनपर्यंत 40 कोटींपेक्षा जास्त वेळा डाउनलोड केला गेला आहे. चीनच्या बाहेर या गेमचे रोजचे 5 कोटी यूजर्स आहेत. कमाई बद्दल बोलायचे तर गेल्या महिन्यात 146 मिलियन डॉलरची कमाई केली आहे जी इतर ऑनलाइन गेम्सच्या कमाई पेक्षा कितीतरी जास्त आहे.

PUBG MOBILE LITE

PUBG चा ट्रेंड वाढवत कंपनीने या गेमचा अजून एक वर्जन PUBG MOBILE LITE पण भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने हा वर्जन खासकरून त्या गेमिंगचा शौक असलेल्या लोकांसाठी बनवला जे लोएंड स्पेसिफिकेशन्स असलेले फोन वापरतात. PUBG MOBILE LITE या ऑनलाइन गेमचा हलका आणि वेगवान वेरिएंट आहे. कंपनी म्हणते कि, ‘ PUBG MOBILE LITE त्या लोकांसाठी आहे. जे यूजर PUBG गेम खेळू इच्छितात पण कमी रॅम व फोन मध्ये कमी स्टोरेज असल्यामुळे हा हेवी गेम फोन डाउनलोड करू शकत नाही. तसेच गेम फोन मध्ये असेल तरीही स्मार्टफोनच्या स्लो प्रोसेसिंग मुळे गेम खेळात येत नाही.’