चीनी गेम PUBG ची जागा घेण्यासाठी आला ‘Made in India’ FAU:G, करेल दुसऱ्या गेम्सची सुट्टी

भारतात PUBG मोबाईल वर बंदी आल्यावर भारतात डेवलपर्ससाठी एक नवीन मार्ग खुला झाला आहे. भारतात सर्वात लोकप्रिय गेम PUBG बंद झाल्यामुळे अंदाज लावला जात होता कि लवकरच एखादा ‘मेड इन इंडिया’ रॉयल बॅटल गेम सादर केला जाऊ शकतो. आता पबजी बॅन झाल्यानंतर दोन दिवसानंतर भारतीय मोबाईल गेम पब्लिशर nCore Games ने फियरलेस अँड यूनाइटेड: गार्ड्स किंवा FAU: G नावाच्या एका नवीन ऍक्शन गेमची घोषणा केली आहे. GOQii, FAU: G चे सीईओ विशाल गोंडल यांच्या मते त्यांनी हा ऍप प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या “Atmanirbhar ऍप” योजने अंतर्गत बनवला आहे.

FAU: G गेम बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारच्या मेंटरशिप अंतर्गत पण विकसित केला गेला आहे. आता पर्यंत अपकमिंग FAU: G गेम बद्दल कोणतीही खास माहिती समोर आलेली नाही. पण टीजरच्या आधारावर असे वाटते आहे कि FAU: G किंवा FAU-G एक खेळाडू विरुद्ध मल्टीप्लेयर शूटर गेम असेल जो PUBG MOBILE प्रमाणे खेळात येईल. या गेमच्या येण्याची घोषणा भारत सरकारने PUBG मोबाईल, PUBG मोबाईल लाइट आणि 116 इतर चीनी ऍप्स वर बंदी घातल्यावर लगेचच करण्यात आली आहे.

चीनची कंबर तोडण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने काल मोठा निर्णय घेत देशात 118 चायनीज ऍप्स बॅन करण्याचा आदेश जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या आधी पण भारत सरकारने चीनी ऍप्स देशात बंद केले आहेत ज्यात TikTok सारख्या सुपरहिट ऍपचा पण समावेश होता. सरकारने हा निर्णय घेण्यामागे राष्ट्रीय सुरक्षेचे कारण दिले होते. प्रतिबंधित ऍप्सच्या यादीत पबजी व्यतिरिक्त अनेक लोकप्रिय ऍप्लिकेशनचा समावेश आहे. लिस्ट मध्ये पबजी मोबाईल लाइट, लूडो, बायडू, सुपर क्लीन, शायोमीचा शेयरसेव, वीचॅट वर्क, साइबर हंटर आणि याचा लाइट वर्जन, गेम ऑफ सुल्तान्स, गो एसएमएस प्रो, मार्वल सुपर वार इत्यादींचा समावेश आहे. इथे बघा भारतात बॅन झालेल्या चीनच्या 200 ऍपची लिस्ट.

भारतीय सैन्याने बॅन केले हे ऍप्स

अलीकडेच भारतीय सैन्याने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Facebook, Instagram, Truecaller, आणि PUBG सहित 89 ऍप वर बंदी घातली आहे. या ऍप्समुळे सौन्याला फक्त साइबर घुसखोरीची भीती नाही तर माहिती फुटण्याची पण चिंता आहे. सरकारने 59 चीनी ऍप्स वर बंदी घातली होती. पण आर्मीने बंदी घातलेल्या ऍप्सची यादी थोडी मोठी आहे आणि यात लोकप्रिय ऍप जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम व डेटिंग ऍप टिंडरचा पण समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here