POCO X2 आला समोर, 8जीबी रॅम सह बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट

गेल्या काही दिवसांपासून एकाच फोनमुळे हिट झालेल्या Xiaomi च्या सब-ब्रँड Pocophone बद्दल अनेक बातम्या समोर येत आहेत. चर्चा अशी आहे कि 2018 मध्ये लॉन्च झालेल्या Poco F1 नंतर आता कंपनी सीरीजच्या दुसऱ्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो Poco F2 नावाने लॉन्च केला जाईल. गेल्या आठवड्यात Poco F2 चा एक ट्रेडमार्क ऍप्लिकेशन डाक्यूमेंट इंटरनेट वर शेयर झाला होता, ज्यामुळे या तर्काना बळकटी दिली होती कि Poco F2 बद्दल कंपनी लवकरच एखादी घोषणा करू शकते. पण आता Xiaomi फॅन्स आणि Pocophone लवर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यात ब्रँडच्या एका नवीन फोन POCO X2 चा खुलासा झाला आहे.

POCO X2 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 14 जानेवारीची आहे जिथे फोनचे नाव Xiaomi POCO X2 लिहिण्यात आले आहे. या लिस्टिंगने पोकोफोन लीक्सला एक नवीन दिशा दिली आहे ज्यामुळे बोलले जात आहे कि कंपनी POCO F2 स्मार्टफोन सह POCO X2 स्मार्टफोन पण आणू शकते. पण अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये अशी पण चर्चा आहे कि POCO X2 POCO F2 चे दुसरे नाव असू शकते.

POCO X2

पोको एक्स2 बद्दल बोलायचे तर गीकबेंच वर या फोनच्या नावासह इतर काही स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख केला आहे. लिस्टिंग मध्ये हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 1.80गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याची बाब गीकबेंच वर समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट वर POCO X2 मध्ये चिपसेटच्या जागी ‘phoenixin’ लिहिण्यात आले आहे. हा चिपसेट कोणत्या मॉडेल नंबर सह येईल हे अजून समोर आले नाही.

POCO X2 गीकबेंच वर 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता पोको एक्स2 ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 547 प्वाइंट्स मिळाले आहेत तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 1767 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच व्यतिरिक्त POCO X2 च्या इतर कोणतीही माहिती अजूनपर्यंत समोर आली नाही. त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि याच्या लॉन्च बद्दल अजूनही काही म्हणणे कठीण आहे.

POCO F2

पोको एफ2 बद्दल बोलायचे तर एका टिपस्टरने आपल्या ट्वीट मध्ये Poco F2 चे ट्रेडमार्क ऍप्लिकेशन डाक्यूमेंट शेयर केला आहे. हे ट्रेडमार्क ऍप्लिकेशन Xiaomi ने भरले आहे ज्यात स्पष्टपणे Poco F2 लिहिण्यात आले आहे. शेयर केल्या गेलेल्या डाक्यूमेंट्स मध्ये एक फाइल इग्रंजी मध्ये आहे तर दुसरी फाइल चीनी भाषेत आहे. ट्रेडमार्क मध्ये पोको एफ2 च्या लॉन्च डेट किंवा स्पेसिफिकेशन्सची खास माहिती मिळाली नाही पण हे डाक्यूमेंट समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि Xiaomi Pocophone द्वारे Poco F2 अवश्य लॉन्च केला जाईल आणि येत्या काही आठवड्यांत या स्मार्टफोनची अधिकृत माहिती पण कंपनी टीज करू शकते.

पोकोफोन ग्लोबल हेड Alvin Tse च्या एका ट्वीट बद्दल बोलायचे तर एलविन यांनी एका व्यक्तीच्या ट्वीटला रिप्लाई करत Poco F2 बद्दल पोस्ट केली होती. ट्वीटर यूजरने पोको ब्रँड कडून Poco F1 चा सक्सेसर म्हणजे आगामी वर्जन बद्दल विचारले होते, ज्याचे उत्तर देताना एलविन यांनी लिहिले कि, “You will hear more from POCO in 2020.” म्हणजे तुम्ही साल 2020 मध्ये POCO बद्दल खूप काही ऐकणार आहात. एलविन यांनी काही वेळात आपले ट्वीट डिलीट केले. पण या ट्वीट नंतर असे बोलले जात होते कि Poco F2 नावाने नवीन फोन शाओमी द्वारे लॉन्च केला जाऊ शकतो. POCO च्या कोणत्याही आगामी फोन बद्दल अजूनतरी ठोस काही बोलता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here