OPPO च्या नवीन डुअल स्क्रीन स्मार्टफोन पेटेंट झाला जारी, काहीसा असा असेल हा फोन

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने साल 2018 मध्ये एक पेटेंट फाइल केले होते, ज्याला मान्यता मिळाली आहे. या पेटेंट वरून डिजाइनचा खुलासा झाला आहे. पेटेंट मधून समोर आलेल्या डिजाइन वरून Nokia Communicator ची आठवण येते. बोलले जात आहे कि ओप्पोचा नवीन फोन बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल.

ब्रँडस बदल बोलायचे तर सर्वांमध्ये फोल्डेबल फोन सादर करण्याची स्पर्धा सुरु आहे. ओप्पो येत्या काळात आपला फोल्डेबल फोन्स सादर करू शकते. डिजाइन पाहता डिवाइस लॅपटॉप सारख्या फोल्डेबल स्क्रीन सह येईल. वॉल्यूम बटण आणि पावर बटणची प्लेसमेंट पाहता हे हँडसेटच्या खालच्या बाजूला असतील. जे फोल्ड झाल्यावर फोनच्या उजव्या बाजूला जातील.

फोटोज मध्ये कॅमेरा पोजिशन व्यतिरिक्त इतर माहिती समोर आली नाही. तसेच फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि बाकि माहितीसाठी वाट बघावी लागेल. तसेच कंपनी हा डिवाइस कोणत्या सीरीज मध्ये सादर करेल हे देखील बघावे लागेल.

अलीकडेच ओप्पोचा नवीन पेटेंट दिसला होता. या पेटेंट मध्ये समोर आलेल्या इमेज मध्ये पॉप अप कॅमेरा बाजूला दिसला होता. याव्यतिरिक्त या फोनची जास्त माहिती समोर आली नाही. पण बोलले जात आहे कि हा डिवाइस फाइंड एक्स सीरीज मध्ये सादर केला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि Oppo Find सीरीजचा विस्तार करणार आहे. बातमी अशी होती कि Oppo Find X2 लवकरच टेक मंचावर येईल. Oppo Find X2 ची माहिती चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबोच्या माध्यमातून समोर आली होती.

Oppo चे Vice President Brian Shen यांनी वेईबो पोस्टच्या माध्यमातून हा आगामी स्मार्टफोन टीज केला होता. ब्रायन शेन Oppo Global Marketing चे President पण आहेत. ब्रायन यांनी वेईबो वर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत ‘हॅपी न्यू ईयर’ लिहिले होते. या पोस्ट मध्ये ब्रायन यांनी #FindX2 चा वापर केला आहे. ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि आता ओपो फाइंड सीरीजच्या नवीन फोन वर काम सुरु झाले आहे आणि हा ओपो फाइंड एक्स2 नावाने टेक बाजारात लॉन्च केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here