8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च झाला हा अनोखा रेनो फोन, फोटो बघून व्हाल हैराण

जेव्हापासुन ओपो ने घोषणा केली होती कि कंपनी रियलमी नंतर अजून एक नवीन सब-ब्रँड ‘ओपो रेनो’ नावाने घेऊन येत आहे तेव्हा पासून संपूर्ण टेक विश्व या नवीन सीरीजच्या लॉन्चची वाट बघत आहे. वेळोवेळी रेनो संबधीत लीक समोर येत होते, ज्यात ब्रँडच्या आगामी स्मार्टफोनची माहिती मिळत होती. आज या तमाम लीक्स व गॉसिपना पूर्णविराम देत ओपो ने रेनो टेक मंचावर सादर केला आहे. या नवीन ब्रँड अंतर्गत ओपो रेनो आणि ओपो रेना 10एक्स झूम एडिशन नावाने दोन फोन लॉन्च केले गेले आहेत. यात ओपो रेनो 10एक्स ब्रँडचा हाईएंड फोन आहे जो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च झाला आहे. चला एक नजर टाकूया ओपो रेनो 10एक्स झूम एडिशनच्या लुक, डिजाईन व फीचर्स तसेच स्पेसिफिकेशन्स वर :

ओपो रेनो डिजाईन
ओपो रेनो फक्त दमदार स्पेसिफिकेशन्स सह येत नाही तर खूप ओनोख्या आणि शानदार डिजाईन वर पण बनला आहे. साधारणता पॉप-अप सेल्फी कॅमेरा किंवा या स्लाईड पॅनल फोनच मार्केट मध्ये आले आहेत. पण ओपो रेनो कंपनीने खूप खास पॉप अप डिजाईन वर बनवला आहे. हा फोन फुल बेजल लेस डिस्प्ले वर बनला आहे ज्यात कोणताही पंच होल किंवा नॉच देण्यात आली नाही. या फोनचा सेल्फी कॅमेरा एक पॉप-अप मॉड्यूल मध्ये फिट आहे. हा कॅमेरा सेल्फी कमांड देताच वर येतो. साधारणतः पॉप-अप कॅमेरा चौकोनी आकाराचा असतो पण ओपो रेनो चा पॉप-अप कॅमेरा त्रिकोणी आकाराचा आहे जो एका बाजूने वर येतो. याच बाजूवर कॅमेरा सेंसर आहे. कंपनी ने याला ‘शार्क फिन पॉप-अप’ नाव दिले आहे.

ओपो रेनो च्या डिस्प्ले खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर मधोमध वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे तसेच त्याखाली ओपोचा लोगो आणि टॅगलाईन आहे. ओपो रेनो च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आले आहे तसेच डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. स्पीकर, 3.5एमएम जॅक तसेच यूएसबी टाईप-सी पोर्ट फोनच्या खालील पॅनल वर देण्यात आला आहे.

कॅमेऱ्याची खूबी
नावावरूनच समजते कि या फोनचा कॅमेरा सेटअप 10एक्स झूम च्या नवीन टेक्नॉलॉजी सह येतो. या टेक्नॉलॉजी मुळे ओपो रेनो च्या या एडिशन मध्ये 16एमएम पासून 160एमएम पर्यंतची फोकल लेंथ मिळते ज्यामुळे लांबच्या आब्जेक्ट चा फोटो पण स्पष्ट दिसतो तसेच नाइज फ्री कॅप्चर होतो. हा कॅमेरा सेटअप हाइब्रिड ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन (OIS) सोबत सुपरक्लियन नाइट मोड फीचरला पण सपोर्ट करतो.

ओपो रेनो 10एक्स झूम एडिशनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. फोनचा दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जी 120डिग्री अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. तसेच बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी साठी ओपो रेनो च्या या ​एडिशन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स
ओपो रेनो 10एक्स झूम एडिशन 93.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.65-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या स्क्रीन वर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीने हा फोन एंडरॉयड पाई आधारित कलरओएस 6 वर सादर केला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो.

ओपो रेनो चा हा एडिशन कंपनी द्वारा दोन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे जे 8जीबी रॅम तसेच 6जीबी रॅमला सपोर्ट करतात. तसेच या वेरिएंट्स मध्ये 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ओपो रेनो 10एक्स झूम एडिशन मध्ये डुअल फ्रिक्वेंसी जीपीएस व एनएफसी सारखे फीचर्स आहेत. चांगल्या गेमिंगसाठी या फोन मध्ये गेम बूस्ट 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 4,065एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत
6जीबी रॅम व 128जीबी मेमरी = 3,999 युआन (जवळपास 41,000 रुपये)
6जीबी रॅम व 256जीबी मेमरी = 4,499 युआन (जवळपास 46,000रुपये)
8जीबी रॅम व 256जीबी मेमरी = 4,799 युआन (जवळपास 51,000 रुपये)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here