भारतात येत आहे ओपोचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8जीबी रॅम असलेला फोन, कंपनी ने केले ट्वीट

ओपो ने ऑगस्ट महिन्यात चीनी बाजारात आपला हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आर17 प्रो लॉन्च केला होता. हा फोन 8जीबी च्या पावरफुल रॅम सह शानदार फीचर्सला सपोर्ट करतो. तर आता ओपो आपला हा दमदार स्मार्टफोन भारतात आणण्याची तयारी करत आहे. ओपो इंडिया ने आॅफिशियली अनाउंस केले आहे कि कंपनी लवकरच इंडियन मार्केट मध्ये आपली ‘आर स्मार्टफोन सीरीज’ आणणार आहे.

ओपो इंडिया ने अपने ट्वीटर हँडल वरून आॅफिशियल केले आहे कि कंपनी लवकरच देशात ‘आर सीरीज’ आणत आहे. ओपो ने ट्वीटर वर 5 सेकंदांचा एक वीडियो टीजर शेयर केला आहे ज्यात R लेटर सोबत एक स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे. या ट्वीट मध्ये कपंनी ने ‘समथिंग न्यू ईज कमिंग अप’ लिहून सोबत ओपो आर सीरीज ​हॅशटॅग पण ​लावला आहे. या ट्वीट वरून हे स्पष्ट झाले आहे कि ओपो आर सीरीज लवकरच भारतात येणार आहे पण कंपनी कधी आपला हा नवीन फोन लॉन्च करेल याबद्दल काहीच सांगत येत नाही.

ओपो आर17 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ‘वी’ शेप की नॉच वाल्या वाटरड्रॉप डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे तसेच ओपो ने आपल्या या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर दिला आहे.

हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह ओपो च्या आॅपरेटिंग सिस्टम कलर ओएस 5.2 सह सादर करण्यात आला आहे. ओपो आर17 प्रो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. कंपनी ने आर17 प्रो 8जीबी पावर फुल रॅम मेमरी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो आर17 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 3डी डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्यात एआई ब्यूटी मोड आहे.

OPPO R17 Pro

ओपो आर17 प्रो 4जी फोन आहे तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये सुपर वीओओसी चार्जिंग सपोर्ट वाली 3,700एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ओपो आर17 प्रो पर्पल आणि ब्लू ग्रेडिएंट रंगांत चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ओपो आर17 चीन मध्ये 4,299 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसीनुसार जवळपास 44,000 रुपये होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here