13GB रॅम असलेला फोन स्वस्तात विकत घेण्याची संधी गमावू नका; फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरा

गणेशत्सोवच्या निमित्ताने जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी शानदार ऑफर घेऊन आलो आहोत. मोबाइल निर्माता OPPO च्या एका दमदार स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे. कंपनीनं मार्चमध्ये लाँच केलेला लोकप्रिय OPPO A96 स्मार्टफोन 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

OPPO A96 वर बँक ऑफर, नो कॉस्ट ईएमआय, EMI आणि मोठी एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही बजेटयामध्ये एक नवीन मोबाइल विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा मोबाईल तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम, 128GB स्टोरेज, 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि सुंदर डिजाइन देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया OPPO A96 वर मिळणाऱ्या ऑफर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स. हे देखील वाचा: ओप्पोनं केली कमाल! स्वस्तात लाँच केला 50MP Camera आणि 5000mAh बॅटरी असलेला OPPO A57s

OPPO A96 ची किंमत ऑफर्स

ओप्पो कंपनीचा हा हँडसेट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 23,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. यावर कंपनी सध्या 25 टक्के म्हणजे की 6,000 रुपयांची सूट देत आहे. या ऑफरनंतर तुम्ही OPPO A96 स्मार्टफोन फक्त 17,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकाल. बँक ऑफर अंतगर्त आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर 10 टक्के डिस्काउंट दिला जात आहे.

तर Bank of Baroda क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रँजॅक्शनवर देखील 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच एचएसबीसी बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांची सूट दिली जात आहे. OPPO A96 तुम्ही नो कॉस्ट ईएमआय आणि सामान्य EMI ऑप्शनवर देखील विकत घेऊ शकता. तसेच तुमची तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून या डिवाइसवर 14,400 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.

OPPO A96 चे स्पेसिफिकेशन्स

Oppo A96 स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो Full HD+ रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला पांडा ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. OPPO A96 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2MP चा पोर्टेट लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: स्वस्तात फर्स्ट क्लास फोन! OPPO A57e भारतात लाँच, पाहा याची प्राइस आणि कसे आहेत स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू आहे. यात 8GB पर्यंत रॅम मिळतो, जोडीला 5GB एक्सपांडेबल रॅमचा सपोर्ट देखील मिळतो म्हणजे फोनचा रॅम 13GB पर्यंत वाढवता येतो. OPPO A96 स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित कलर ओएसवर चालतो. डिवाइसमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here