OPPO A93 होणार आहे लॉन्च, जाणून घ्या का असेल हा फोन खास

OPPO ने 2 सप्टेंबरला भारतात आपल्या ‘एफ सीरीज’ चा विस्तार करत दोन नवीन स्मार्टफोन OPPO F17 आणि OPPO F17 Pro लॉन्च केले होते. यातील ओपो एफ17 ची किंमत समोर येणे बाकी आहे तर ओपो एफ17 प्रो 22,990 रुपयांमध्ये आज म्हणजे 7 सप्टेंबर पासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. एफ17 सीरीज नंतर आता बातमी येत आहे कि ओपो टेक मंचावर आपल्या ‘ए सीरीज’ मध्ये पण नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे आणि हा नवीन फोन OPPO A93 नावाने लॉन्च केला जाईल.

OPPO A93 ची माहिती प्रसिद्ध टिपस्टर इवान ब्लासने शेयर केली आहे. इवानने आपल्या ट्वीटर हँडल वर ओपो ए93 चे काही फोटोज शेयर केले आहेत ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. फोटो मध्ये ओपो ए93 पूर्णपणे भारतात लॉन्च झालेल्या ओपो एफ17 प्रो सारखा दिसत आहे. फोन मध्ये डुअल पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. फ्रंट पॅनलच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘पिल शेप’ मध्ये दोन होल्स आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या बाजूला उजवीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे जो चौकोनी आकारात येतो.

ओपो ए93 चे हे फोटोज समोर आल्यानंतर बोलले जात आहे कि ओपो भारतात लॉन्च झालेल्या OPPO F17 Pro स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये OPPO A93 नावाने लॉन्च करू शकते. इवान द्वारे शेयर करण्यात आलेल्या फोटोज मध्ये फोनचे ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट्स पण दिसले आहेत आणि ओपो एफ17 प्रो पण भारतात Magic Blue, Matte Black आणि Metallic White कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. भारतात ओपो एफ17 प्रो 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

OPPO F17 Pro

ओपो एफ17 प्रो बद्दल बोलायचे तर हा फोन कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. एफ17 प्रो ची स्क्रीन 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करते. हा फोन एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह फोन मध्ये मीडियाटेक हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे.

OPPO F17 Pro डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.4 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सल मोनो लेंस आणि तेवढ्याच अपर्चरची 2एम मोनो लेंस आहे. हा फोन 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी असलेल्या 4,015एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here