फक्त 8,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला ओपो चा फोटो सेंट्रिक स्मार्टफोन ओपो ए83, यात आहे 2.5गीगाहर्ट्ज चा दमदार प्रोसेसर

टेक कंपनी ओपो ने एप्रिलमध्ये आपला बेजल लेस बजेट स्मार्टफोन ए83 4जीबी रॅम सह बाजारात आणला होता. हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोेरेजला सपोर्ट करतो तसेच कंपनी ने हा फोन 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. तर आज कंपनी ने आपल्या या हिट स्मार्टफोनचा अजून एक नवीन मॉडेल भारतात सादर केला आहे. ओपो ए83 2जीबी रॅम सह लॉन्च केला आहे. हा फोन फक्त 8,990 रुपयांमध्ये आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

ओपो ए83 चा हा नवीन वेरिएंट कपंनी ने 2जीबी रॅम मेममरी सह सादर केला आहे. 2जीबी रॅम सह हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. कंपनी ने रॅम व मेमरी व्यतिरिक्त फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स तेच ठेवले आहेत. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.7-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन कलर ओएस 3.2 आधारित एंडरॉयड नुगट वर लॉन्च झाला आहे ज्या सोबत हा 2.5गीगाहर्ट्ज 64बिट्स आॅक्टा-कोर मीडियाटेक एमटी6763टी चिपसेट वर चालतो.

ओपो ए83 कंपनी ने फोटो सेंट्रिक स्मार्टफोन म्हणून सादर केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनचा सेल्फी कॅमेरा आपल्या ब्यूटी इंटेलिजेंस मुळे चांगले फोटो घेऊ शकतो. तसेच यात एआई ब्यूटीफिकेशन्स टेक्नॉलॉजी आहे.

ओपो ए83 मध्ये कंपनी ने फिजिकल फिंगरप्रिंट स्कॅनर च्या ऐवजी फक्त फेशियल अनलॉक टेक्नॉलॉजी दिली आहे. कंपनीच दावा आहे कि हा फोन 128 प्वाइंट्स सह यूजरचा चेहरा स्कॅन करून फक्त 0.18 सेकेंड मध्ये फोन अनलॉक होऊ शकतो. हा फोन बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीई व डुअल सिम ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी यात 3,090एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here