108MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगसह Oppo A1 Pro लाँच

Oppo च्या नव्या A सीरीजचा पहिला प्रो स्मार्टफोन Oppo A1 Pro लाँच झाला आहे. ओप्पोचा हा फोन प्रीमियम फिचर्स आणि शानदार डिजाइनसह सादर करण्यात आला आहे जो मिडरेंजमध्ये लोकांना आवडू शकतो. नव्या Oppo A1 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 108 MP Camera, 67W Fast Charging आणि 4800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सध्या हा नवा ओप्पो स्मार्टफोन कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच झाला आहे परंतु लवकरच हा हँडसेट भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. पुढे आम्ही तुम्हाला Oppo A1 Pro स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Oppo A1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले
  • Snapdragon 695 SoC
  • 4800mAh बॅटरी (67W फास्ट चार्ज)
  • 108MP चा प्रायमरी कॅमेरा
  • 16MP चा फ्रंट कॅमेरा
  • अँड्रॉइड 13

Oppo A1 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 93 टक्के आहे. प्रोसेसिंग पावरसाठी ओप्पोनं या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 SoC चा वापर केला आहे. सोबत LPDDR4x रॅम आणि आयएफएस 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4800mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेला Oppo स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी; अशी आहे ऑफर

फोटोग्राफीसाठी Oppo A1 Pro स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो, जोडीला 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. ओप्पोचा हा फोन Android 13 आधारित ColorOS 13 वर चालतो. तसेच या नव्या ओप्पो स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरियो स्पिकर, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि NFC कनेक्टिव्हिटीचा ऑप्शन मिळतो. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

Oppo A1 Pro ची किंमत

Oppo A1 Pro स्मार्टफोन चीनमध्ये तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 8GB + 128GB सह 1,799 चिनी युआन (सुमारे 20,700 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB + 256GB स्टोरेजसह 1,999 चिनी युआन (सुमारे 23,000 रुपये) आणि टॉप व्हेरिएंट 12GB + 256GB स्टोरेजसह 2,299 चिनी युआन (सुमारे 26,400 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन मून सी ब्लॅक, डाउन गोल्ड आणि मोर्निंग रेट ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here