शाओमीच्या आधी वनप्लस आणेल का आपला 5जी फोन ?

संपूर्ण जगासोबतच भारत पण 4जी इंटरनेट चा मोठा बाजार बनला आहे. 4जी कनेक्टिविटी ने भारतात आपले जाळे पसरवले आहे आणि सध्या प्रत्येक स्मार्टफोन ब्रँड आणि टेलीकॉम कंपन्या 4जी सपोर्ट तसेच 4जी नेटवर्क देत आहेत. 4जी च्या यशानंतर आता सर्वांची नजर सुपरफास्ट 5जी नेटवर्क कडे आहे. क्वालकॉम व स्नॅपड्रॅगॉन सारख्या दिग्गज चिपसेट व प्रोसेस​र बनवणर्या कंपन्यांनी घोषणा केली आहे कि त्या 5जी सपोर्ट असलेले चिपसेट बनवण्यात यशस्वी झाल्या आहेत. तसेच अनेक स्मार्टफोन ब्रँड्सनी पण पुढल्या वर्षी 5जी फोन आणण्याची घोषणा केली आहे . त्यात एक मोठी बातमी अशी आली आहे कि टेक कंपनी वनप्लस 5जी सपोर्ट असलेले फोन आणण्यासाठी एक नवीन ब्रँड बाजारात आणेल.

वनप्लस ने सीनेट ला सांगितले आहे कि कंपनी पुढल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये 5जी सपोर्ट असलेला स्मार्टफोन नक्कीच घेऊन येत आहे पण हा फोन कंपनी एखाद्या नवीन ब्रँडिंग सह बाजारात येईल. आतापर्यंत कंपनी वनप्लस 5, 5टी तसेच वनप्लस 6, 6टी टाइटल सह फोन लॉन्च करत आहे तर आपल्या 5जी स्मार्टफोन सोबतच कंपनी आपला नवीन ब्रँड पण बाजारात घेऊन येईल. ज्याप्रमाणे शाओमी ने ‘पोकोफोन’ आणि ओपो ने ‘रियलमी’ लॉन्च केला आहे त्याचप्रमाणे वनप्ल्स पण आपला नवीन ब्रँड घेऊन येऊ शकते.

वनप्लस च्या या नवीन ब्रँड अंतर्गत कंपनीचे 5जी सपोर्ट असलेले स्मार्टफोन लॉन्च केले जातील. पुढच्यावर्षी बार्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 च्या मंचावरून वनप्लस आपला हा नवीन ब्रँड तसेच कंपनीचा पहिला 5जी स्मार्टफोन लॉन्च करेल याची दाट शक्यता आहे. वनप्लसचा हा 5जी फोन कोणत्या ब्रँड अंतर्गत लॉन्च होईल तसेच कंपनी आपल्या पहिल्या 5जी फोनला काय नाव देईल याबद्दल अजूनतरी काही सांगता येणार नाही.

काही मीडिया रिर्पोट्स मध्ये असे सांगण्यात आले आहे कि वनप्लसचा नेक्स्ट स्मार्टफोन वनप्लस 7 च 5जी सपोर्ट सह ईऊल हाच कंपनीचा पहिला 5जी फोन असेल. पण वनप्लस 7 5जी सपोर्ट सह येण्यासाची शक्यता खूप कमी आहे. तुम्हाला तर माहितीच आहे वनप्लस टाइटल सह लॉन्च होणारे कंपनीचे सर्व स्मार्टफोन्स ‘फ्लॅगशिप कीलर’ स्मार्टफोन म्हणून ओळखले जातात. आणि हे नाव त्यांना कमी किंमतीती दमदार स्पेसिफिकेशन्स असल्यामुळे देण्यात आले आहे.

तर दुसरीकडे जर वनप्लस 7 5जी सपोर्ट सह लॉन्च करण्यात आला तर या फोनची किंमत वाढेल. त्यामुळे वनप्लस ब्रँड अंतर्गत लॉन्च होणार कोणताही स्मार्टफोन महाग किंमतीती लॉन्च करून कपंनी आपले ‘फ्लॅगशिप कीलर’ हे टाइटल संपुष्टात आणू इच्छित नाही. त्यामुळे 5जी फोन आणण्यासाठी ​वनप्लस आपला एक नवीन ब्रँड लॉन्च करेल याची शक्यता अजून वाढते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here