येत आहे स्वस्त OnePlus Nord N10 5G, लॉन्चच्या आधी फीचर्स झाले लीक

चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी वनप्लस आपल्या नवीन डिवाइस OnePlus 8T वर काम करत आहे. बोलले जात आहे कि फोन सप्टेंबरच्या शेवट्पर्यंत किंवा अक्टूबर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि कंपनी एक नवीन मिड-रेंज अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord N10 5G सादर करण्याची योजना बनवत आहे. Nord सीरीज मध्ये येणारा हा नवीन फोन सर्वात आधी U.S मध्ये सादर केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये फोनच्या किंमतीची आणि स्पेसिफिकेशन्सची पण माहिती समोर आली आहे.

OnePlus Nord N10 5G चे स्पेसिफिकेशन्स

Android Central च्या रिपोर्ट नुसार OnePlus Nord N10 5G मध्ये 6.49-इंचाचा FHD+ डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच या मिड-रेंज वनप्लस फोन मध्ये Snapdragon 690 SoC असेल जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 600 सीरीजचा पहिला 5G कनेक्टिविटी सह येणारा चिपसेट असेल. तसेच फोन मध्ये 6GB रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. OnePlus Nord N10 5G बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये मागे क्वाड-कॅमेरा सिस्टम असेल, ज्यात 64MP प्राइमरी कॅमेरा, 8MP वाइड-अँगल लेंस आणि दोन 2MP सेंसर असतील.

OnePlus Nord N10 5G ची किंमत आणि लॉन्च डेट

रिपोर्ट नुसार OnePlus Nord N10 5G ची किंमत OnePlus Nord पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यावरून अंदाज लावला जात आहे कि फोनची किंमत $200 (जवळपास 15,000 रुपये) च्या आसपास असेल. OnePlus Nord N10 5G च्या लॉन्च डेट बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण बोलले जात आहे कि फोन OnePlus 8T च्या लॉन्च नंतर सादर केला जाईल.

OnePlus 8T

अलीकडेच समोर आलेल्या PriceBaba च्या रिपोर्ट मध्ये OnePlus 8T च्या कथित रेंडर्स व स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली होती. रिपोर्टनुसार, फोन मध्ये 6.55 इंचाच्या डिस्प्ले सह फुल-एचडी+ रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असेल. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर सह येईल, सोबत दोन कॉन्फिग्रेशन देण्यात येतील एक 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि दुसरा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज.

असे पण सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर दिला जाईल. सोबत एक 2 मेगापिक्सलचा पोट्रेट सेंसर पण या कॅमेरा सेटअप मध्ये मिळेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी वनप्लस 8टी फोन मध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो होल-पंच कटआउट सह स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे असेल. तसेच बोलले जात आहे कि फोन मध्ये 4,500 एमएएच च्या बॅटरी सह 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS 11 सह येऊ शकतो.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here