OnePlus पुन्हा करेल सरप्राइज, लॉन्चपुर्वी लो बजेटमधील Nord N20 फोन इंडियन साइटवर झाला लिस्ट

OnePlus NOrd

OnePlus गाजावाजा करत आपल्या आगामी फ्लॅगशिप वनप्लस 9 सीरीजच्या लॉन्चची तयारी करत आहे. ही नवीन सीरीज 23 मार्चला लॉन्च केली जाईल. तसेच दुसरीकडे कंपनीच्या Nord सीरीजच्या फोन्स बद्दल लीक व बातम्या येऊ लागल्या आहेत. अलीकडेच टिप्स्टर OnLeaks ने Ebba कोडनेम असलेल्या Nord N10 च्या अपग्रेडेड वेरिएंटचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स लीक केले होते. आता OnePlus Nord N10 चा अपग्रेडेड वर्जन EB2101 मॉडेल नंबरसह इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS वर दिसला आहे. या सर्टिफिकेशन वरून स्पष्ट झाले आहे की कंपनी आतापर्यंतचा सर्वात किफायती फोन वनप्लस नॉर्ड एन 10 चा अपग्रेडेड वर्जन कंपनी भारतात आणण्याचा विचार करत आहे.

इंडियन साइटवर झाला लिस्ट
91mobiles ने BIS वेबसाइटवर मॉडेल नंबर EB2101 चा OnePlus चा नवीन स्मार्टफोन स्पॉट केला आहे. हा मॉडेल OnePlus ‘Ebba’ फोन असू शकतो, ज्याचा अर्थ असा आहे की हा लवकरच भारतात लॉन्च होण्यासाठी तयार आहे. बीआईएस लिस्टिंगवरून वनप्लस ईबी 2101 फोनबाबत काहीच माहिती समोर आली नाही. पण बोलले जात आहे की OnePlus Ebba फोन एप्रिल किंवा मे मध्ये भारतात नॉर्ड सीरीजचा एक किफायती डिवाइस म्हणुन लॉन्च होऊ शकतो.

स्पेसिफिकेशन्स
अलीकडेच OnLeaks ने दिलेल्या माहितीनुसार फोनमध्ये 6.49 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. त्याचबरोबर डिस्प्लेवर उजव्या कोपर्‍यात होल-पंच कटआउट असेल. तसेच चिनच्या तुलनेत कडेवरची बेजल जास्त बारीक असतील. हँडसेटमध्ये मागे एक ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. आशा आहे की हा फोन कंपनी OnePlus Nord N20 नावाने सादर करू शकते.

आतापर्यंत समोर समोर आलेल्या माहितीनुसार डिवाइसचा रियर पॅनल प्लास्टिकचा असेल. तसेच, मागील भाग रियर ग्लॉसी फिनिशसह येईल आणि यात वनप्लसचा लोगो असेल. हँडसेटमध्ये मागे ट्रिपल-कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.

कंपनीने वनप्लस नॉर्ड 20 च्या लॉन्च डेट संबंधित कोणतीही माहिती सांगितली नाही. बोलले जात आहे की वनप्लस नॉर्ड 20 मध्ये खालच्या बाजूला 3.5 एमएम हेडफोन जॅक दिला जाईल आणि डिवाइसमध्ये कडेला एक फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here