4 जून पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल OnePlus 7, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

फ्लॅगशिप ​कीलर नावाने ओळखली जाणाऱ्या टेक कंपनी OnePlus ने काही दिवसांपूर्वी भारतात आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत स्मार्टफोन्सची रेंज वाढवत दोन नवीन व पावरफुल डिवाईस OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro लॉन्च केले होते. OnePlus 7 Pro पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह येतो तर OnePlus 7 वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे. फोन लॉन्च सोबतच OnePlus 7 Pro देशात सेल साठी उपलब्ध झाला होता पण कंपनीने OnePlus 7 बाजारात आणला नव्हता. आज कंपनीने OnePlus 7 ची तारीख सांगितली आहे.

OnePlus ने अधिकृतपणे माहिती देत सांगितले आहे कि OnePlus 7 स्मार्टफोन येत्या 4 जून पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल. OnePlus 7 Pro वर्जन प्रमाणे OnePlus 7 स्मार्टफोन पण कंपनीच्या आफिशियल वेबसाइट सोबत शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर विक्री साठी उपलब्ध होईल. किंमत पाहता OnePlus 7 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली तर OnePlus 7 चा 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OnePlus 7
फोनचे स्पेसि​फिकेशन्स पाहता OnePlus 7 2,340 x 1,080 ​पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.41-इंचाच्या आप्टिक एमोलेड वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. फोन अनलॉकिंग साठी फोनच्या स्क्रीन मधेच अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित आक्सिजन ओएस वर सादर केला गेला आहे जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो.

OnePlus 7 फोटोग्राफी साठी डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा 0.8-माइक्रोन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन एफ/2.4 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी कॅमेरा बद्दल बोलायचे तर OnePlus 7 च्या फ्रंट पॅनल वर नॉच मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन सिक्योरिटी व अनलॉकिंग साठी यात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचर पण आहे. तसेच पावर बॅकअप साठी OnePlus 7 मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 20वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली बॅटरी देण्यात आली आहे. येत्या 4 जून पासून हा फ्लॅगशिप कीलर भारतात सेल साठी उपलब्ध होईल.

OnePlus 7 Pro
OnePlus 7 Pro मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा क्यूएचडी+ फ्लूइड ऐमोलेड डिस्प्ले दिला आहे ज्याचे रेजोल्यूशन 3120×1440 पिक्सल आहे. तसेच फोनचा आस्पेक्ट रेशियो 18.5:9 आणि स्क्रीन-टु-बॉडी रेशियो 93 टक्के आहे. OnePlus 7 Pro 6जीबी रॅम/ 128जीबी इंटरनल स्टोरेज, 8जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 12जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे जो क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. OnePlus 7 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा मेन सेंसर एफ/1.6 अपर्चर वाला आहे आणि कंपनीने यात 48-मेगापिक्सलची Sony IMX5867पी लेंस आहे. हा सेंसर ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. सोबत दुसरा सेंसर 8—मेगापिक्सलचा आहे जी टेलीफोटो लेंस आहे. यात तिसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे जो वाइड-एंगल साठी देण्यात आला आहे. हा सेंसर 117-डिग्री फिल्ड ऑफ व्यू ला सपोर्ट करतो.

बॅटरी बद्दल बोलायचे तर OnePlus 7 Pro मध्ये Wrap चार्ज 30 फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे कि फक्त 20 मिनिटांत हा 48 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल. तसेच डिवाइस एंडरॉयड 9 पाई बेस्ड ऑक्सिजन ओएस वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here