वनप्लस 7 चा वीडियो आला समोर, हा फोन बनवेल यशाचे रेकॉर्ड, बघा पहिला लुक

फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळखली जाणाऱ्या टेक कंपनी वनप्लस ने आपले नेममकेच स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. पण वनप्लसचे हे निवडक स्मार्टफोनच हिट झाले आहेत. आपल्या स्मार्टफोन्सचे यश पुन्हा मिळवण्यासाठी कंपनी आता वनप्लस 7 वर काम करत आहे. या स्मार्टफोन बद्दल आतापर्यंत अनेकलीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती मिळाली आहे. त्यातच वनप्लस 7 वर शिक्कामोर्तब करत प्राइज बाबा ने वनप्लस 7 चा रेंडर वीडियो इंटरनेट वर शेयर केला आहे. हा वीडियो प्रसिद्ध टिपस्टर ऑनलीक्स सोबत भागेदारीत बनवण्यात आला आहे आहे ज्यात फोनचा फुल लुक आणि डिजाईन दिसत आहे.

वनप्लस 7 संबंधित आपल्या रिपोर्ट मध्ये प्राइज बाबा ने ऑनलीक्सशी हात मिळवणी करून हा वीडियो शेयर केला आहे. हा वीडियो 5के क्वालिटी वाला आहे जो 360 डिग्री रेंडर वीडियो म्हणून शेयर केला गेला आहे. या वीडियो मध्ये फोनच्या फ्रंट आणि बॅक पॅनल सोबत दोन्ही साईड पॅनल्स तसेच वरील आणि खालचा पॅनल पण दाखवण्यात आला आहे. या वीडियो वरून वनप्लस 7 चा डिस्प्ले, कॅमेरा सेग्मेंट सोबतच स्पीकर्स, यूएसबी स्लॉट्स तसेच फोन मधील इतर पोर्ट्सची माहिती पण मिळाली आहे. या वीडियो मध्ये वनप्लस 7 चा फुल लुक दिसत आहे.

वनप्लस 7 ची डिजाईन
वनप्लस 7 या वीडियो मध्ये फुलव्यू डिस्प्ले सह दिसत आहे. फोन मध्ये नॉच देण्यात आलेली नाही. डिस्प्लेच्या खालच्या बाजूस बारीक बॉडी पार्ट आहे तसेच इतर तिन्ही बाजू पूर्णपणे बेजल लेस आहेत. नॉच नसल्यामुळे वनप्लस 7 पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा फोनच्या डावीकडे आहे. पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याच्या पुढे स्पीकर बार देण्यात आला आहे. या पॉप-अप कॅमेऱ्यात एकच सेंसर आहे. वनप्लस 7 च्या पॉप-अप कॅमेऱ्याची प्लेसमेंट फोनच्या रियर कॅमेऱ्या पासून वेगळी आहे.

32एमपी सेल्फी कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह येईल सॅमसंग गॅलेक्सी ए60 स्मार्टफोन

वनप्लस 7 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर मधोमध देण्यात आला आहे. वनप्लस 7 च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेऱ्यांच्या ऐवजी दोन इतर सेंसर पण दिसले आहेत ज्यांचे डिटेल अजूनतरी समोर आलेले नाहीत. या कॅमेरा सेटअपच्या खाली कंपनीचा लोगो आहे. वनप्लस 7 च्या उजव्या पॅनल वर दोन बटण देण्यात आले आहेत ज्यात एक पावर बटण आहे तर दुसरा फिंग​रप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे.

वनप्लस 7 च्या खालच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल आणि यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. समोर आलेल्या या रेंडर मध्ये वनप्लस 7 मध्ये 3.5एमएम जॅक दिसत नाही. वहीं साईड माउंटेड फिंगरप्रिंट बटण व्यतिरिक्त या फोन मध्ये अनलॉकिंग साठी इतर कोणताही ऑप्शन दिसत नाही. वनप्लस 7 चा बॅक पॅनल ग्लॉसी आणि शाईनी आहे. आशा आहे कि कंपनी आपला आगामी स्मार्टफोन ग्लास बॉडी वर लॉन्च करू शकते.

रेडमी नोट 7 ला मागे टाकण्यासाठी आला रियलमी 3 स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळतील शानदार फीचर्स

वनप्लस 7 चे स्पेसिफिकेशन्स
रेंडर वीडियोसोबत रिपोर्ट मध्ये फोनचे स्पेसिफिकेशन्स पण आहेत. रिपोर्ट नुसार वनप्लस 7 मध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह क्वालकॉमच्या लेटेस्ट आणि पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी वनप्लस 7 मध्ये 4,150एमएएच ची फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी दिली जाऊ शकते. आशा आहे कि वनप्लस 7 दुसऱ्या सहामाहीत भारतात येईल.

सूत्र : प्राइज बाबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here