OnePlus 7 Pro बद्दल समोर आली आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती, या फीचर्स सह होईल हा दमदार फोन

वनप्लस द्वारा यावर्षी सादर केला जाणाऱ्या OnePlus 7 बद्दल अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत आहे. डिवाइस पुढल्या काही महिन्यात लॉन्च केला जाईल. पण यावेळी माहिती समोर आली आहे कि कंपनी OnePlus 7 सोबत फोनचा अजून एक वेरियंट लॉन्च करू शकते जो OnePlus 7 Pro असेल.

अलीकडेच OnePlus 7 को चीनी सोशल मीडिया वेबसाइट वीबो वर दिसला होता, ज्यात त्याच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात एक 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. OnePlus 7 Pro चा फोटो पहिल्यांदा लीक झाला आहे. हा फोन चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबो वर पहिल्यांदा दिसला आहे.

लीक मध्ये फोनचा फ्रंट आणि बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे. लीक झालेले फोटो पाहता याच्या फ्रंट पॅनलवर बेजल नाहीत आणि यात नॉच पण नाही. याचा अर्थ असा कि फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे OnePlus चे मुख्य कार्यकारी अधिकारी पेटे लाउ यांनी 2018 च्या डिसेंबर मध्ये सांगितले होते कि OnePlus च्या आगामी फ्लॅगशिप मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट प्रोसेसर दिला जाईल. यावरून हे स्पष्ट झाले आहे कि हा फोन 5G ला सपोर्ट करेल.

OnePlus 7 Pro चे कॅमेरा फीचर्स पाहता जी माहिती इमेज मधून समोर आली आहे त्यानुसार फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा असेल. फोन मध्ये प्राइमरी कॅमेरा 48-मेगापिक्सलचा असेल. तसेच इतर कॅमेरा सेंसर यात 16-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सलचे असतील. त्याचबरोबर फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असेल.

सोबतच फोन लेटेस्ट एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर सादर केला जाईल. फोन मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. लाइव इमेज व्यतिरिक्त भारतातील फेमस लीक्सटर इशान अग्रवाल ने एक ट्विट करून वनप्लस 7 प्रो बद्दल माहिती दिली आहे. ट्विट नुसार OnePlus 7 प्रो फ्लॅगशिप वेरिएंट मधील सर्वात महाग हँडसेट असेल, जो मे मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here