वनप्लस 7 मध्ये स्क्रीनच्या आत असेल सेल्फी कॅमेरा, फोटो व स्पेसिफिकेशन्स लीक

वनप्लस या आठवड्याच्या सुरवातीपासून चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी वनप्लस बद्दल बातमी आली होती कि कंपनीने आपल्या 5जी फोन वर काम सुरु केले आहे आणि हा स्मार्टफोन नवीन ब्रॅण्डिंग सह बाजारात आणेल. हा बातमीत सांगण्यात आले होते कि वनप्लस आता पर्यंत फक्त वनप्लस 5, 5टी तसेच वनप्लस 6, 6टी टाइटल सह फोन लॉन्च करत होती तर कंपनीचा हा आगामी 5जी फोन वनप्लस 7 नव्हे तर इत्तर कोणत्या तरी टाइटल/ब्रॅण्ड सह लॉन्च होईल. पण आज समोर आलेल्या एका ताजा लीक मध्ये वनप्लस 7 चे फोटोज शेयर झाले आहेत आणि या फोन मध्ये वनप्लस 7 5जी नेटवर्क सपोर्ट असलेला दाखवण्यात आला आहे.

वनप्लस 7 च्या या क​थित फोटो मध्ये फोन पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या तीन साईड दिसत आहेत ज्या पूर्णपणे फोनच्या बॅक पॅनल पर्यंत कोणत्याही बॉडी पार्ट विना जोडले गेले आहेत. म्हणजे फोनच्या वरच्या तसेच उजव्या व डाव्या बाजूला फक्त फोनची स्क्रीन आहे व फोन बॉडी बिल्कुलही देण्यात आलेली नाही तसेच इथे कोणतीही नॉच व सेंसर नाही. फोनच्या फ्रंट पॅनल वरच स्क्रीनच्या मध्ये कॅमेरा होल आहे. ज्यावरून समजते कि वनप्लस 7 इन-​डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

वनप्लस 7 चा फ्रंट कॅमेरा फोनच्या बॉडी वर नसून डिस्प्ले मध्ये असेल ज्याच्या चारही बाजूला फोनची स्क्रीन असेल. समोर आलेल्या फोटो मध्ये वनप्लस 7 5जी कनेक्टिविटी सपोर्टेड दाखवण्यात आला आहे. तसेच फोनच्या नोटिफिकेशन बार मध्ये फोनच्या डुअल सिम सपोर्टची माहिती मिळते. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि वनप्लसचा सेल्फी कॅमेरा 24-मेगापिक्सलचा असेल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल, 12-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरा सेंसर असतील.

वनप्लस 7 के बॅक पॅनल वरील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेपचा असेल जो फ्लॅश लाईटला सपोर्ट करेल. वनप्लस 7 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिसला नाही त्यामुळे हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार हा फोन पावर बॅकअप साठी 4,150एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल. आधी आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि पुढल्या वर्षी बार्सिलोना मध्ये आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 च्या मंचावरून वनप्लस आपला पहिला 5जी स्मार्टफोन लॉन्च करेल.

पण अजूनतरी वनप्लसचा पहिला 5जी फोन वनप्लस 7 असेल कि कंपनी एखदा नवीन ब्रॅण्ड सादर करेल हे निश्चित सांगता येत नाही. फ्लॅगशिप कीलर नावाने प्रसिद्ध वनप्लस जोपर्यंत आपल्या 5जी फोन व वनप्लस 7 बद्दल आॅफिशियल घोषणा करत नाही तोपर्यंत वनप्लस 7 च्या लीक वर विश्वास ठेवता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here