वनप्लस 7 मध्ये नॉच ऐवजी असेल स्लाइडिंग कॅमेरा, यावर्षी होईल लॉन्च

चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करेल, ज्याबद्दल गेल्यावर्षीपासून माहिती समोर येत आहे. बोलले जात आहे कि कंपनी यावर्षी मे किंवा जूनच्या आधी डिवाइस लॉन्च करेल जो वनप्लस 7 असेल. आता स्लॅशललीक ने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात वनप्लस 6टी सोबत वनप्लस 7 पण दिसत आहे. फोटो मध्ये दिसत आहे कि स्मार्टफोन मध्ये बारीक बेजल्स आहेत.

तसेच वनप्लस 6टी च्या तुलनेत वनप्लस 7चे स्पीकर थोडे रुंद वाटत आहेत. या फोटो मध्ये डिवाइसचा खालील भाग दाखवण्यात आलेला नाही. फोटो मध्ये वनप्लस 7 मध्ये कोणतीही नॉच नाही, त्यावरून वाटते कि यावेळी वनप्लस 7 मध्ये स्लाइडर असू शकतो. अशी डिजाइन आपण ओपो फाइंड एक्स मध्ये बघितली आहे.

नोव्हेंबर मध्ये वनप्लस ने आपल्या 6 सीरीजचा नवीन फोन 6टी बाजारात सादर केला होता. दामदार स्पेसिफिकेशन असलेला हा फोन अजूनही खूप चर्चेत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कंपनी ने याच्या नवीन वर्जन वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशनची घोषणा केली होती आणि आता हा फोन भारतात उपलब्ध झाला आहे.

नावावरूनच समजते की हा फोन कंपनी ने ऑटोमोबाइल कंपनी मॅक्लारेन सोबत मिळून आणला आहे. मॅक्लारेन खास करून आपल्या रेसिंग कारसाठी ओळखली जाते आणि कंपनी पण हा फोन स्पीड सोबत जोडून सादर करत आहे. वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन मध्ये 10जीबी रॅम देण्यात आला आहे. भारतात 10जीबी रॅम सह लॉन्च होणार हा पहिला फोन आहे. सोबतच फोन मध्ये वार्प चार्जिंग देण्यात आली आहे. कंपनीनुसार हा जुन्या डॅश चार्जिंग पेक्षा जास्त फास्ट आहे.

भारतीय बाजारात वनप्लस 6टी ची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होत आहे पण 6टी मॅक्लारेन एडिशन साठी तुम्हाला 50,999 रुपये द्यावे लागतील. हा वनप्लसचा आतापर्यंतचा सर्वात महाग डिवाइस आहे. वनप्लस 6टी मैक्लारेन एडिशन मध्ये मुख्य फरक रंगाचा आणि रॅमचा आहे. फोन गडद मेटॅलिक रंगात सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here