100W सुपरफास्ट चार्जिंगसह OnePlus 11R लाँच

Highlights

  • OnePlus 11R भारतात लाँच झाला आहे.
  • हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर चालतो.
  • 12GB RAM आणि 100W SuperVOOC fast charging सह झाली एंट्री.

वनप्लसनं आज आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजचा विस्तार करत दोन मॉडेल भारतात सादर केले आहेत. OnePlus 11 सह OnePlus 11R देखील भारतीयांच्या भेटीला आला आहे. स्टाईलिश लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेल्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर, 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग आणि 50MP IMX890 सेन्सर सारखे जबरदस्त फीचर्स मिळतात. वनप्लस 11आरची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

OnePlus 11R Specifications

  • 6.74″ AMOLED 120Hz Display
  • 16GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Triple Rear + 16MP Selfie
  • 100W SuperVOOC fast charging

वनप्लस 11आर 5जी फोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. हा डिस्प्ले 1440हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग, 1450निट्स ब्राइटनेस, 450पीपीआय आणि 1.07बिलियन कलरला सपोर्ट करतो.

प्रोसेसिंगसाठी या वनप्लस फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 730 जीपीयू आहे. हा वनप्लस फोन LPDDR5X RAM आणि UFS 3.1 ROM ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11आर स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स890 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर वाले 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

वनप्लस 11आर 5जी फोन अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सिजन ओएसला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टीरियो स्पिकर, ब्लूटूथ 5.2 आणि वायफाय सारखे फीचर्स देखील मिळतात.

OnePlus 11R Price

OnePlus 11R ची किंमत पाहता याच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. 21 फेब्रुवारीपासून ग्राहक हा फोन प्री-बुक करू शकतील तर 28 फेब्रुवारीपासून हा हँडसेट सेलसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here