16GB RAM सह दणकट OnePlus 11 ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत

Highlights

  • OnePlus 11 मध्ये 16GB RAM सह 256GB स्टोरेज मिळते.
  • फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग स्पीड देण्यात आला आहे.
  • OnePlus 11 आजपासूनच प्री बुक करता येईल.

हल्ली बजेट आणि मिडरेंजमध्ये स्मार्टफोन सादर करत असली तरी वनप्लसच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. याच वनप्लस प्रेमींना खुश करण्यासाठी कंपनीनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 भारतात सादर केला आहे. कंपनीच्या नव्या फ्लॅगशिप OnePlus 11 मध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग असे दणकट फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया याची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

OnePlus 11 Price in India

वनप्लस 11 5जीचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. ज्यात 8GB RAM व 128GB स्टोरेज आणि 16GB RAM व 256GB स्टोरेजचा समावेश आहे. बेस मॉडेलची किंमत 56,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप एन्ड मॉडेल 61,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन आज म्हणजे 7 फेब्रुवारी पासून अ‍ॅमेझॉन प्री बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन टायटन ब्लॅक आणि इटर्नल ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होईल.

OnePlus 11 Specifications

  • 6.7 QHD+ 2K E5 AMOLED डिस्प्ले
  • 50MP+48MP+32MP रियर कॅमेरा
  • 16GB RAM + 256GB storage
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग

वनप्लस 11 मध्ये 6.7 इंचाचा सुपर फ्ल्युइड अ‍ॅमोलेड डिस्प्ले 2के रिजोल्यूशनसह मिळतो. ज्यात 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेला हा ई5 अ‍ॅमोलेड पॅनल आहे, जो 120हर्ट्ज डायनॅमिक रिफ्रेश रेटवर चालतो. तसेच हा डिस्प्ले 525ppi, 1000hz टच रिस्पॉन्स रेट, 10 बिट कलर आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. हा कर्व्ड एज डिस्प्ले आहे जो दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलकडे वळला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो ज्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळते.

OnePlus 11 5G फोन अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सिजन ओएसवर चालतो. या मोबाइल फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्जच्या फास्ट क्लॉक स्पीडवर चालतो. हा वनप्लस मोबाइल LPDDR5X RAM आणि UFS4.0 storage टेक्नॉलॉजीसह येतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 740 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ 1.8 अपर्चर असलेला 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ 2.2 अपर्चर असलेली 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ 2.0 अपर्चर असलेली 32MP Sony IMX709 2X पोर्टरेट लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ 2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 8GB RAM आणि 48MP Camera सह स्वस्त POCO X5 5G लाँच, सर्व स्पेसिफिकेशन्स आहेत शानदार

कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G सह ब्लूटूथ 5.3, जीपीएस आणि वायफाय 6 असे ऑप्शन मिळतात. त्याचबरोबर यात डॉल्बी अ‍ॅटमॉस, हॅप्टिक मोटार आणि अलर्ट स्लायडर देखील आहे. पावर बॅकअपसाठी वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. या मोठ्या बॅटरीसह स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी यात 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत बॅटरी फुल चार्ज करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here