OnePlus 11 ची लाँच डेट लीक! कंपनीच्या 9th anniversary च्या दिवशी येऊ शकतो स्मार्टफोन

OnePlus 11 Series ची चर्चा गेले कित्येक दिवस टेक विश्वात सुरु आहे. पावरफुल स्पेसिफिकेशन्स आणि शानदार फीचर्स असलेले अनेक लीक्स आधीच समोर आले आहेत आणि आता नवीन रिपोर्टमध्ये लाँच डेट देखील समोर आली आहे. 17 डिसेंबरला कंपनी आपला नववा वर्धापनदिन साजरा करत आहे आणि ताज्या माहितीनुसार याच दिवशी वनप्लस 11 सीरीजवरील पडदा देखील हटवला जाऊ शकतो. यात OnePlus 11, OnePlus 11 Pro आणि OnePlus 11R स्मार्टफोनचा समावेश असेल जे 17 डिसेंबरला लाँच केले जाऊ शकतात.

17 डिसेंबरला वनप्लस 9 वर्ष पूर्ण करत आहे. हा कंपनीसाठी मोठा आनंदाचा दिवस असेल आणि हे निमित्त खास बनवण्यासाठी OnePlus 9th-anniversary conference चं आयोजन केलं जात आहे. कॉन्फ्रेंस सोबतच वनप्लस 11, 11 प्रो आणि 11आर स्मार्टफोन देखील बाजारात येऊ शकतात, अशी ठोस माहिती मात्र कंपनीनं दिली नाही. हा इव्हेंट चीनमध्ये आयोजित केला जाईल. हे देखील वाचा: ओटीपी नव्हे तर फक्त मिस कॉल देऊन बँक अकाऊंटमधून काढले 50 लाख; असा आहे ‘सिम स्वॅप’ फ्रॉड

OnePlus 11 Specifications

वनप्लस 11 संबंधित लीक्स आणि अन्य रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. लीकनुसार, हा वनप्लस मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येईल ज्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा दिली जाऊ शकते.

OnePlus 11 स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 वर लाँच केला जाऊ शकतो ज्यात ऑक्टा कोर प्रोसेसरसह 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार हा वनप्लस मोबाइल 16जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करेल तसेच यात 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार या फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 48MP IMX581 अल्ट्रा वाइड लेन्स आणि 32MP IMX709 2x झूम कॅमेरा दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या सर्व Hasselblad लेन्स असू शकतात. तसेच पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते, जोडीला 5,000एमएएच ची बॅटरी असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here