OnePlus 10T vs iQOO 9T: 50 हजारांच्या बजेटमध्ये कोणता आहे बेस्ट ऑप्शन? पाहा स्पेसिफिकेशन्सची तुलना

हा आठवत भारतीय स्मार्टफोन बाजारासाठी शानदार आहे. तीन दिवसांत दोन तगडे फोन भारतात लाँच झाले आहेत. आधी iQOO 9T नं बाजारात पाऊल टाकले आणि त्यानंतर OnePlus 10T देखील बाजारात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 आणि हायएंड स्पेसिफिकेशन्ससह फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये लाँच करण्यात आले आहेत. जर तुम्ही देखील एखादा शक्तिशाली स्मार्टफोन विकत घेण्याचं नियोजन करत असाल तर आयकू 9टी तसेच वनप्लस 10टी तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात. आयकू 9टी आणि वनप्लस 10टी दोन्ही 49,999 रुपयांमध्ये लाँच झाले आहेत. त्यामुळे यापैकी कोणता फोन 50 हजार रुपयांच्या किंमतीला न्याय देतो ते जाणून घेऊया. पुढे आम्ही दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशनवर आधारीत एक छोटीशी तुलना केली आहे ज्यामुळे तुम्हाला या फोन्सची चांगली माहिती मिळेल.

OnePlus 10T vs iQOO 9T: Display

वनप्लस 10टी स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 950निट्स ब्राईटनेस आणि 1000हर्ट्ज टच रिस्पांस रेटला सपोर्ट करते. आयकू 9टी मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एक अ‍ॅमोलेड पॅनल आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन डिस्प्ले एचडीआर10+ सारख्या फीचर्ससह येतो तसेच कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

OnePlus 10T vs iQOO 9T: Processor

वनप्लस 10टी आणि आयकू 9टी दोन्ही मोबाईल फोन अँड्रॉइड ओएस 12 वर लाँच झाले आहेत ज्यात प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट देण्यात आला आहे. वनप्लस स्मार्टफोन ऑक्सिजन ओएस 12.1 वर चालतो तर आयकू मोबाईलमध्ये ओरिजन ओशियन ओएस देण्यात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 ला सपोर्ट करतात.

OnePlus 10T vs iQOO 9T: Camera

फोटोग्राफीसाठी वनप्लस 10टी च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स766 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. आयकू 9टी देखील ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल सॅमसंग जीएन5 प्रायमरी सेन्सरसह 13एमपी अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 12एमपी पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे.

OnePlus 10T vs iQOO 9T: Battery

शक्तिशाली स्पेसिफिकेशन्ससह या दोन्ही स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी देखील आहे. आयकू 9टी स्मार्टफोन 4,700एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. तर दुसरीकडे वनप्लस 10टी स्मार्टफोन 4,800एमएएच बॅटरीवला सपोर्ट करतो जी 150W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आली आहे.

OnePlus 10T vs iQOO 9T: Price

OnePlus 10T

8GB RAM + 128GB Storage = 49,999

12GB RAM + 256GB Storage = 54,999

16GB RAM + 256GB Storage = 59,999

iQOO 9T

8GB RAM + 128GB Storage = 49,999

12GB RAM + 256GB Storage = 54,999

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here