OnePlus 10 Pro ची किंमत 5000 रुपयांनी करण्यात आली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

वनप्लस कंपनी टेक मंचावर आपली लेटेस्ट आणि सर्वात पावरफुल नंबर सीरीज OnePlus 11 Series लाँच करण्याची तयारी करत आहे. वनप्लस 11 सीरीज लाँचपूर्वी आता कंपनीनं आपल्या भारतीय चाहत्यांना चांगली भेट दिली आहे. OnePlus 10 Pro price cut झाली आहे. कंपनीनं आपल्या पावरफुल फ्लॅगशिप फोन वनप्लस 10 प्रोच्या किंमतीत थेट 5,000 रुपयांची कपात केली आहे त्यामुळे या फ्लॅगशिप कीलर वनप्लस फोनच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

5 हजार रुपयांनी स्वस्त झाला वनप्लस 10 प्रो

कंपनीनं वनप्लस 10 प्रोच्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात केली आहे. 5 हजार रुपयांच्या प्राइस कट नंतर OnePlus 10 Pro 8GB + 128GB 61,999 रुपयांमध्ये तर 12GB + 256GB व्हेरिएंट 66,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. वनप्लस 10 प्रो Volcanic Black आणि Emerald Forest कलरमध्ये विकत घेता येईल.

OnePlus 10 Pro Price

वनप्लस 10 प्रो किंमत 5,000 रुपयांनी कमी झाली आहे. हा वनप्लस स्मार्टफोन भारतीय बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 66,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 71,999 रुपयांमध्ये आला होता. हे देखील वाचा: सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक

OnePlus 10 Pro चे पावरफुल स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन 6.7 इंचाच्या 2के फ्ल्यूड अ‍ॅमोलेड एलटीपीओ 2.0 पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करती आहे. हा फोन इन -डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो ज्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. फोन स्क्रीन एचडीआर10+ आणि एमईएमसी सारख्या फीचर्ससह येते.

OnePlus 10 Pro अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबीसह भारतात सेलसाठी उपलब्ध आहे ज्यात 128 जीबी तसेच 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा वनप्लस फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.

फोटोग्राफीसाठी OnePlus 10 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. विशेष म्हणजे हा वनप्लस मोबाइल 2nd Gen hasselblad lens सह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वनप्लस 10 प्रो स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 20GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह Realme 10 Pro Plus 5G लाँच; किंमत वनप्लसपेक्षाही कमी

OnePlus 10 Pro पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. वेगानं चार्ज करण्यासाठी यात 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच वनप्लस 10 प्रो स्मार्टफोनमध्ये 50W AirVOOC wireless charging आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here