नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती

नोकिया ने कालच इंडियन मार्केट मध्ये आपले दोन शानदार स्मार्टफोन नोकिया 3.1 प्लस आणि नोकिया 8110 4जी बनाना फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही नोकिया फॅनसाठी मोठे सरप्राईजआहेत कारण चर्चा तर नोकिया 7.1 प्लस ची होती परंतु कंपनी ने आपले इतर दोन फोन बाजारात आणले. जरी नोकिया ने अजून नोकिया 7.1 प्लस च्या लॉन्च बद्दल काही सांगितले नसले तरी आता एक नवीन लीक आला आहे नोकिया 7.1 प्लस चीनी बेंचमार्किंग साइट वर दिसला आहे,ज्यामुळे फोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे.

नोकिया 7.1 प्लस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच वर फोन नोकिया एक्स7 नावाने लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधीपण नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस चीन मध्ये नोकिया एक्स6 तसेच नोकिया एक्स5 नावाने लॉन्च केले गेले होते. गीकबेंच च्या या लिस्टिंग वरून समजले आहे कि नोकिया एक्स7 एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला जाईल तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर वर चालेल.

नोकिया एक्स7 बद्दल ​गीकबेंच लिस्टिंग मध्ये संग्म्यात आले आहे कि एचएमडी ग्लोबल हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह बाजारात आणेल. गीकबेंच वर नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस ला सिंगल-कोर मध्ये 1827 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5937 स्कोर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एचएमडी ग्लोबल येत्या 16 ऑक्टोबरला मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि त्याच दिवशी नोकिया एक्स7 तिथे लॉन्च होईल.

गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर चीन नंतर कंपनी नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस लवकरच भारतात आणेल याची शक्यता वाढली आहे. लीक्स नुसार नोकिया एक्स7 मध्ये 6.2-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन 6जीबी रॅम सह 4जीबी रॅम सह पण लॉन्च केला जाऊ शकतो तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3400एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

काल भारतात लॉन्च झालेल्या नोकिया 3.1 प्लस चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नोकिया 8110 4जी बनाना फोन चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here