नोकिया एक्स7 लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6.18-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा

नोकिया बद्दल खूप दिवसांपासून लीक्स येत होते कि कंपनी आपला नवींन नॉच​ डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन नोकिया 7.1 प्लस वर काम करत आहे आणि हा लवकरच बाजारात येईल. त्यानुसार आज कंपनी ने हा स्मार्टफोन जगासमोर आणला आहे. नोकियाचे मलिकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने नोकिया 7.1 प्लस आज अंर्तराष्ट्रीय बाजारात सदर केला आहे. नोकिया 7.1 प्लस चीन मध्ये नोकिया एक्स7 नावाने लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत भारतात लॉन्च केला जाईल.

नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18.7:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन 2,246 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.18-इंचाच्या टीएफटी स्क्रीन सह बाजारात आणण्यात आला आहे. हा एंडरॉयड ओरियो सह सादर झाला आहे जो आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने नोकिया एक्स7 तीन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर इतर दोघांमध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तिन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा कार्ल जेसिस लेंस सह चांगली फोटोग्राफी कर शकतो. तसेच नोकिया एक्स7 च्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

नोकिया एक्स7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देत आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी नोकिया एक्स7 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया एक्स7 ची किंमत पाहता फोनचा 4जीबी/64जीबी वेरिएंट 1699 युआन, 6जीबी/64जीबी वेरिएंट 1999 युआन आणि 6जीबी/128जीबी वेरिएंट 2499 युआन मध्ये लॉन्च झाला आहे.

नोकिया एक्स7 च्या उपरोक्त सर्व वेरिएंट्स च्या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 18,000 रुपये, 21,000 रुपये व 26,500 रुपयांच्या आसपास आहे. नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस डार्क ब्लू, रेड, सिल्वर व ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च कार्यात आला आहे. अशा आहे कि एचएमडी ग्लोबल लवकरच हा फोन भारतात लॉन्च करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here