Nokia ची 55 इंच 4K स्मार्टटीव्ही इंडियन वेबसाइट वर लिस्ट, एंडरॉयड 9 आणि JBL साउंड सिस्टम सह होईल लॉन्च

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

भारत जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारापॅकी एक आहे. जगभरातील टेक कंपन्या भारतात आपले भविष्य शोधत आहेत. स्मार्टफोनचे मोठे मार्केट बनल्यानंतर आता देशात स्मार्ट टेलीविजनची मागणी वाढत आहे. Samsung व LG च्या फ्लॅगशिप स्मार्ट टेलीविजन सोबत Xiaomi स्वस्त बजेट मध्ये टीव्ही उपलब्ध करवून देत आहे. मागे OnePlus आणि Motorola ने पण भारतात आपला स्मार्ट टेलीविजन आणला होता. आता स्मार्ट टीव्हीच्या बाजारात Nokia पण आपले नशीब अजमावण्यास तयार आहे. Nokia ब्रँड पण भारतात आपला स्मार्ट टेलीविजन लॉन्च करणार आहे आणि हि स्मार्टटीव्ही भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे.

Nokia च्या स्मार्ट टीव्हीची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली होती. Nokia ने या टेलीविजन साठी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट सह भागेदारी केली आहे. कंपनीने अजूनतरी या आगामी टीव्हीचे डिटेल्स शेयर केले नाहीत, पण हा स्मार्टटीव्ही आता भारतीय सर्टिफिकेशन साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे BIS वर लिस्ट झाला आहे. BIS वर हा टीव्ही 55CAUHDN मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे, ज्यावरून टीव्ही संबंधित महत्वाची माहिती मिळाली आहे.

सर्टिफिकेशन्स मध्ये झाला खुलासा

BIS सर्टिफिकेशन्सवरून समजले आहे कि Nokia चा हा आगामी टेलीविजन 55 इंच डिस्प्ले सह बाजारात येईल. बोलले जात आहे कि Nokia स्मार्ट टीव्ही एकापेक्षा जास्त साईज मॉडेल्स सह मार्केट मध्ये लॉन्च होईल. फ्लिपकार्ट सोबत झालेल्या या पार्टनरशिपने स्पष्ट केले आहे कि Nokia स्मार्ट टेलीविजन या शॉपिंग साइट वर एक्सक्लूसिवली विकला जाईल.

Nokia स्मार्ट टीव्ही

नोकिया ब्रँडच्या या पहिल्या स्मार्ट टेलीविजनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक मध्ये समोर आले आहे कि कंपनीचा लॉन्च केला जाणारा टीव्ही 55-इंचाचा असेल. बोलले जात आहे कि हा टीव्ही 4K अल्ट्रा एचडी पॅनल वर बनलेला असेल जो शानदार विजुअल क्वॉलिटी देईल. Nokia स्मार्ट टेलीविजन एंडरॉयड 9.0 पाई ओएस सह येईल. लीकनुसार हा टीव्ही मध्ये इंटेलिजेंट डीमिंग टेक्नोलॉजी वापर करेल तसेच Nokia स्मार्टटीव्ही मध्ये जेबीएलची साउंड सिस्टम असेल.

Realme पण घेऊन येत आहे टीव्ही

91mobiles ला इंडस्ट्री सोर्स कडून अशी माहिती मिळाली आहे कि Realme ब्रँड पण स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि कंपनी यावर्षीच्या शेवटी इंडियन मार्केट मध्ये आपला पहिला टीव्ही लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे. आशा आहे कि Realme स्मार्टटीव्ही पण बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केली जाईल जी अफोर्डेबल असेल. Nokia आणि Realme चे स्मार्ट टेलीविजन बाजारात आल्यामुळे Xiaomi Mi TV ला थेट टक्कर मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here