नोकिया 7.1 आला आहे भारतात, पुढल्या महिन्यात होईल सेल साठी उपलब्ध

नोकिया ब्रँडचे अधिकार असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने याच महिन्याच्या 4 तारखेला ग्लोबल मंचावर आपला स्टाईलिश आणि दमदार स्मार्टफोन नोकिया 7.1 सादर केला होता. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आल्यापासून भारतीय नोकिया फॅन्स नोकिया 7.1 च्या भारतातील लॉन्चची वाट बघत आहेत. आता असे वाटत आहे कि त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नोकिया 7.1 भारतात आला आहे. आता हा फोन आॅफिशियली लॉन्च होण्याची वाट बघावी लागेल आणि मिळालेल्या माहितीनुसार नोकिया 7.1 नोव्हेंबर मध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

दिल्लीत आयोजित आईएमसी 2018 ईवेंट मध्ये एचएमडी ग्लोबलने नोकिया 7.1 प्रदर्शित केला आहे. या ईवेंट मध्ये नोकिया 7.1 चा भारतीय मॉडेल ठेवण्यात आला आहे ज्याच्यासोबत फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. कंपनीने फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही पण पुढल्या महिन्यात नोकिया 7.1 भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल असे समजले आहे. भारतात नोकिया 7.1 4जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम अशा दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

नोकिया 7.1 कंपनी ने ब्रँडचा पहिला प्योरडिस्प्ले टेक्नॉलॉजी वॉल फोन म्हणून सादर केला आहे. या फोन 6000 सीरीज एल्यूमीनियम बॉडी वर बनलेला आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वर 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 2.5डी कर्व्ड कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

नोकिया चा नवीन फोन एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे. एंडरॉयड वन असल्यामुळे नोकिया 7.1 एंडरॉयड पाई रोलआउट होताच नवीन ओएस वर अपडेट होईल. नोकिया 7.1 माडेच प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट आहे जो याची परफॉर्मेंस फास्ट आणि स्मूथ करतो. कंपनी ने नोकिया 7.1 दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 7.1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल फ्लॅश सोबत एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने आपल्या नवीन फोन मध्ये पण कार्ल जेसिस लेंसचा वापर केला आहे ज्याने फोटोग्राफी चांगली होते.

नोकिया 7.1 चे दोन मॉडेल कंपनी ने सादर केले आहेत. एक मॉडेल सिंगल ​सिम आहे तर दुसरा दोन सिम ला सपोर्ट करतो. हा फोन 4जी एलटीई सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपेार्ट वाली 3060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

एचएमडी ग्लोबल ने नोकिया 7.1 को ग्लॉस मीडनाईट ब्लू आणि ग्लॉस स्टील कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता नोकिया 7.1 चा 3जीबी रॅम वेरिएंट 299 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हि किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 25,300 रुपये आहे. तसेच फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 349 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार 29,600 रुपये होतात.

भारतात नोकिया 7.1 कोणत्या किंमतीती लॉन्च होईल यासाठी कंंपनीच्या पुढल्या घोषणेची वाट बघावी लागेल. तसेच भारतीय स्मार्टफोन बाजारात चर्चा सुरु आहे कि नोकिया 7.1 लॉन्च केल्यानंतर काही आठवडयांनी कंपनी नोकिया 7.1 प्लस स्मार्टफोन पण देशात लॉन्च करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here