ओपो-वीवो ला टक्कर देण्यासाठी येत आहे नोकिया चा नॉच वाला फोन, 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल नोकिया 7.1 प्लस

नोकिया चे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल येत्या 4 ऑक्टोबरला लंडन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे त्यातून कंपनी आपला आगामी स्मार्टफोन नोकिया 7.1 प्लस लॉन्च करणार आहे. फोनची किंमत व स्पेसिफिकेशन्स समोर येण्याआधीच नोकिया फॅन या स्मार्टफोन ची भारतात पण वाटू बघू लागले आहेत. स्मार्टफोन यूजर चा हा उत्साह पाहून नोकिया ने पण घोषणा केली आहे की येत्या 11 ऑक्टोबरला नोकिया 7.1 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

नोकिया ने 11 ऑक्टोबरच्या लॉन्च ईवेंट साठी मीडिया इन्वाईट पाठवणे सुरू केले आहे. कंपनी ने मीडिया इन्वाईट मध्ये फोनच्या नावाचा उल्लेख केला नाही पण बोलले जात आहे की 11 ऑक्टोबरला लॉन्च होणारा स्मार्टफोन नोकिया 7.1 प्लस च असेल. देशातील सणासुदीच्या दिवसांची सुरवात नोकिया आपल्या नवीन फोन सह करत आहे. आपल्या लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्स प्रमाणे कंपनी नोकिया 7.1 प्लस पण नॉच डिस्प्ले सह लॉन्च करेल.

नोकिया 7.1 प्लस च्या टेना लिस्टिंग नुसार हा 19:9 आसपेक्ट रेशियो वाल्या 6.18-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार हा फोन एंडरॉयड वन इंटीग्रेटेड एंडरॉयड 8.1 ओरियो वार सादर केला जाईल जो 2.2गीगाहट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल. हा फोन 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो.

टेना नुसार नोकिया 7.1 प्लस च्या बॅक पॅनल 12-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बटरी मिळेल. आशा आहे की भारतात नोकिया 7.1 25,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लॉन्च केला जाईल.

पण नोकिया 7.1 ची भारतीय किंमत तसेच ठोस फीचर्स व स्पेसिफिकेशन्स साठी 11 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here