लॉन्चच्या आधी नोकिया 7.1 प्लस च्या स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा, जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही

गेल्या महिन्यात नोकिया मोबाईलचे मालकी हक्क असणार्‍या कंपनी एचएमडी ग्लोबल ने भारतीय बाजारात दोन नवीन नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस आणले होते. त्याचबरोबर कंपनी ने या फोन्सच्या जागतिक उपलब्धतेबद्दल माहिती पण दिली होती. परंतु या फोन्सच्या लॉन्च नंतर काही दिवसांनी कंपनीच्या अजून एका फोन बद्दल माहिती येऊ लागली. काही लीक नोकिया 7.1 प्लस बद्दल आले आणि अशी माहिती देण्यात आली की हा फोन पण लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन बद्दल थोडी माहिती मिळाली होती पण आता हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. इथून फोन बद्दल खुप माहिती मिळू शकते.

ही बातमी सर्वात आधी एक्सडीए डवलपर्स ने दिली होती. टेना वर नोकिया चा हा फोन टीए—1131 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे तिथे स्पेसिफिकेशन सोबत फोनचे फोटोग्राफ पण उपलब्ध आहेत. स्पेसिफिकेशन पाहून अंदाज लावता येतो की हा मिड रेंज फोन आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कंपनी ने एका ट्विट मधून माहिती दिली आहे की कंपनी 4 ऑक्टोबरला एक फोन लॉन्च करणार आहे त्यामुळे आशा आहे की त्यादिवशी नोकिया 7.1 प्लस जगासमोर येईल.

स्पेसिफिकेशन पाहता नोकिया 7.1 प्लस मध्ये तुम्हाला 6.18—इंचाची मोठी स्क्रीन मिळू शकते. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन फुल एचडी+ (2246×1080 पिक्सल ) आहे आणि कंपनी ने 19:9 आसपेक्ट रेशियो वाल्या आईपीएस एलसीडी डिस्प्लेचा वापर केला आहे. स्क्रीन वर नॉच दिसत आहे.

हा फोन 154.8 × 75.76 × 7.97 डायमेंशन सह उपलब्ध आहे तसेच याचे वजन 185 ग्राम आहे. सध्या नोकियाचा हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात एंडरॉयड वन इंटीग्रेशन आहे त्यामुळे याला लवकरच 9 पाई चा अपडेट पण मिळेल.

प्रोसेसिंग पाहता कंपनी ने सध्या क्लॉक स्पीड ची माहिती दिली आहे. हा फोन 2.2गीगाहट्र्ज वाल्या आॅक्टाकोर प्रोसेसर सह लिस्ट आहे. बोलले जात आहे की हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो. रॅमची माहिती स्पष्ट आहे. फोन 4जीबी आणि 6जीबी रॅम सह लिस्ट करण्यात आला आहे तर इंटरनल स्टारेज 64जीबी आणि 128जीबी ची आहे. या सोबत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण आहे.

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा बद्दल बोलायचे तर फोटो मध्ये तुम्ही डुअल रियर कॅमेरा सेटअप स्पष्टपणे बघू शकता. तसेच लिस्ट केलेल्या नोकिया 7.1 प्लस मध्ये एक सेंसर 12—मेगापिक्सलचा आहे तर दुसरा सेंसर 13—मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 20—मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण आहे.

किंमत पाहता हा फोन कंपनी 25,000 रुपयांच्या बजट मध्ये सादर करू शकते. हा फोन नोकिया 7 प्लस चा अपग्रेड वर्जन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here