नोकिया 7.1 प्लस ची माहिती झाली लीक बघा कसा आहे हा फोन

गेल्या महिन्यात एचएमडी ग्लोबल ने भारतात नोकिया 6.1 आणि 5.1 मोबाईल फोनची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच नोकियाच्या अजून एका फोनची माहिती समोर आली आहे. बातमी अशी आहे कि कपंनी 7.1 प्लस लॉन्च करू शकते आणि फोनचा पॅनल पण लीक झाला होता. आज नोकिया 7.1 प्लस ची लाइव इमेज लीक झाली आहे ज्यात तुम्ही स्पष्टपणे फोन बघू शकता. त्यावरून फोनच्या डिजाइन आणि स्क्रीनचा अंदाज लावता येतो. काही दिवसांपूर्वी आपण पहिले कि नोकिया ने प्लस मॉडेल चीन मध्ये एक्स नावाने लाँन्च केला आहे तूनुसार हा फोन पण चीन मध्ये नोकिया 7एक्स नावाने येऊ शकतो.

यावेळी फोनची डिजाइन नवीन आहे. कंपनी ने मेटलचा वापर केला आहे पण बॅक पॅनल वर ग्लास आहे. फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा वर्टिकल स्टाइल मध्ये मिळेल. तसेच कॅमेऱ्याच्या खालीच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या बाजूला एलईडी फ्लॅश आहे. एक साथ दोन फोटो लीक झाले आहेत ज्यात फोन कलर वेरियंट पण तुम्ही बघू शकता.

इमेज मध्ये नोकिया 7.1 प्लस चा सिल्वर विथ व्हाइट दिसत आहे. त्याचबरोबर खाली कॉपर ब्राउन कलर दिसत आहे. पण आजच्या लीक मध्ये फोनच्या लॉन्च डेट किंवा स्पेसिफिकेशन माहिती देण्यात आलेली नाही पण युद्ध नोकिया ने एक ट्विट केले होते ज्यात सांगण्यात आले होते कि 4 ऑक्टोबरला कंपनी एक गेमिंग फोन लॉन्च करणार आहे. त्यामुळे अशा व्यक्त केली जात आहे कि तेव्हा हाच फोन सादर केला जाईल.

आता पर्यंत आलेल्या लीक नुसरा नोकिया 7.1 आणि नोकिया 7.1 प्लस पहिला फोन असू शकतो ज्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट मिळू शकतो. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी हा फोन 19:9 आसपेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here