चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतात आला स्वस्त Nokia 5.3, जाणून घ्या किंमत

नोकिया ने आज पुन्हा एकदा भारतात कमबॅक करत भारतीय बाजारात आपले चार फोन्स सादर केले आहेत. कंपनीने आज आयोजित केलेल्या एका इवेंट मध्ये Nokia 5.3, Nokia C3, Nokia 125 आणि Nokia 150 फीचर फोन सादर केले आहेत. नोकिया 5.3 बद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वी नोकियाच्या अधिकृत वेबसाइट वर फोनची सर्व माहिती सार्वजनिक झाली होती. आज कंपनीने अधिकृतपणे याच्या किंमतीचा खुलासा पण केला आहे.

Nokia 5.3 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत. पण बॉटमला बारीक चिन पार्ट आहे. या चिन वर ‘Nokia’ ची ब्रॅंडिंग आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वर्तुळाकृती रियर कॅमेरा सेटअप मधोमध आहे. फोनचे डायमेंनशन 164.3 x 76.6 x 8.5एमएम आणि वजन 180ग्राम आहे. कंपनीने नोकिया 5.3 Cyan, Sand आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च केला आहे.

स्पेसिफिकेशन्स

नोकिया 5.3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 6.55 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह येतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Nokia 5.3 एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 4 जीबी व 6 जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 5.3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो या सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 5.3 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 5.3 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

डुअल सिम Nokia 5.3 ची विक्री 25 ऑगस्ट पासून अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरु होईल. किंमत पहा फोनच्या 4GB/64GB आणि 6GB/64GB वेरीएंटची किंमत क्रमश: 13,999 रुपये व 15,499 रुपये आहे. Nokia 5.3 सध्या Nokia.com आणि अमेझॉन वर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे. अमेझॉन इंडिया वरून फोन खरेदी केल्यावर जियो सब्सक्राइबर्सना 4,000 रुपयांचे फायदे मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here