ओटीपी नव्हे तर फक्त मिस कॉल देऊन बँक अकाऊंटमधून काढले 50 लाख; असा आहे ‘सिम स्वॅप’ फ्रॉड

बँक, सरकार आणि टेक वेबसाइट सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी एक सोपा सल्ला देतात, तो म्हणजे कधीही कुणाशीही ओटीपी शेयर करू नका. यामुळे अनेक सायबर गुन्हे रोखता येतात. परंतु जर आता आम्ही तुम्हाला सांगितलं की ओटीपी शेयर न करता देखील तुमची फसवणूक होते तर? अलीकडेच घडलेल्या एका सायबर फ्रॉडमध्ये दिल्ली मधील एका व्यक्तीच्या बँक अकाऊंटमधून 50 लाख फक्त मिस कॉल्समुळे गेले. गुन्हेगाराने त्याच्याकडे ओटीपीची मागणी केली नाही तरीही त्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या अकाऊंटवरून अनेक ट्रँजॅक्शन करण्यात गुन्हगाराला यश मिळालं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार दिल्ली मधील एका सिक्योरिटी सर्व्हिसच्या डायरेक्टरने सायबर क्राइममुळे 50 लाख गमावले आहेत. त्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी संध्याकाळी 7 ते 8.45 दरम्यान लागोपाठ अनेक ब्लँक कॉल आणि मिस कॉल्स आले होते. यातील काही कॉल्सकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि जे उचलेले त्यात कोणी काही बोलत नव्हतं. परंतु थोड्या वेळाने जेव्हा त्या व्यक्तीनं आपल्या मोबाइलवरील मेसेज पहिले तेव्हा त्याला धक्का बसला. त्याच्या अकाऊंटवरून 50 लाखांचे रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ट्रँजॅक्शन करण्यात आले आहेत. हे देखील वाचा: 14 हजारांच्या रेंजमध्ये OPPO A58x 5G लाँच; मिळतेय 5000mAh battery आणि 13GB RAM

यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रथमदर्शनी ही फसवणूक झारखंडमधील जामतारामधून झाली असावी असा अंदाज लावला जात आहे. ज्या लोकांच्या अकाऊंटमध्ये हे पैसे गेले त्यांनी आपले अकाऊंट गुन्हेगाराला भाड्याने दिले असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. यावेळी सायबर गुन्हेफारांनी ‘SIM swap’ पद्धतीचा वापर करून फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. ब्लँक किंवा मिस कॉस RTGS ट्रान्सफर सुरु करण्यासाठी आणि OTP अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी करण्यात आले होते. संलग्न कॉलच्या आयव्हीआरच्या माध्यमातून स्कॅमर्सना ओटीपी मिळाल्याची शक्यता आहे.

“या फ्रॉडमध्ये स्कॅमर्स लोकंच्या मोबाइल फोन कॅरियर्सशी संपर्क करता आणि त्यांना त्यांच्याकडील सिम अ‍ॅक्टिव्हेट करण्यास भाग पडतात. एकदा यात यश आलं की ते संपूर्ण फोनचा ताबा घेतात” अशी माहिती पोलिसांनी टाइम्सला दिली आहे. हे देखील वाचा: टाटाच्या इलेक्ट्रिक कारशी पंगा घेण्यासाठी येतेय Citroen C3; भारतीय लाँचची जोरदार तयारी

‘SIM swap fraud’ म्हणजे काय?

SIM switch fraud किंवा सिम स्वॅप फ्रॉड तेव्हा होतो जेव्हा स्कॅमर तुमचा फोन नंबर वापरून व्हिक्टीमच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवतो यासाठी टू स्टेप ऑथेंटिकेशन आणि व्हेरिफिकेशनमधील दोषांचा वापर केला जातो. सिम स्विचिंगसाठी स्कॅमर तुमच्या मोबाइल फोनच्या सिम प्रोव्हायडरशी संपर्क साधतो आणि त्यांना त्यांच्याकडे असलेलं सिम अ‍ॅक्टिव्हेट करण्यास भाग पडतो. एकदा का सिम सक्रिय झालं की स्कॅमर त्या मोबाइल नंबरवर येणाऱ्या कॉल्स आणि टेक्स्ट मेसेजवर नियंत्रण मिळवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here