पंच-होल डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा असलेला Motorola One Action भारतात लॉन्च, Xiaomi Mi A3 ला मिळेल टक्कर

लेनोवोच्या मालकीच्या कंपनी मोटोरोला ने आज भारतात आपला नवीन डिवाइस Motorola One Action लॉन्च केला आहे. हा फोन गेल्या आठवड्यात ग्लोबली लॉन्च केला गेला होता. भारतात हा कंपनीचा दुसरा फोन आहे, ज्यात पंच होल डिस्प्ले मिलेग. चला बघूया या फोन बद्दल सर्वकाही.

शानदार डिजाइन

Motorola One Action मध्ये पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोन मध्ये डिस्प्लेच्या वर छोटेसे छिद्र (पंच-होल) आहे आणि या छिद्रात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल वर Android One लिहिण्यात आले आहे.

याचा बॅक पॅनल प्लास्टिक फिनिश वाला आहे. मागे ट्रिपल रियर कॅमेरा आहे उजव्या बाजूला वर वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर Moto चा लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर आणि यूएसबी टाईप पोर्ट आहे.

डिस्प्ले

Motorola One Action मध्ये 21:9 सिनेमाविजन डिस्प्ले होल-पंच डिजाइन सह देण्यात आला आहे. फोन 1,080 x 2,520 पिक्सल रेज्ल्यूशन सह 6.3-इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

रॅम, स्टोरेज आणि प्रोसेसर

4 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज सह येतो आणि सॅमसंगच्या Exynos 9609 प्रोसेसर वर चालतो. ग्राफिक्स साठी फोन मध्ये Mali G72 GPU देण्यात आला आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

बॅटरी आणि ओएस

डिवाइस मध्ये 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड वन प्रोग्रामचा भाग आहे आणि हा एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. फोनला पावर देण्यासाठी यात 3,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10W चार्जिंग सपॉर्ट सह येते.

कॅमेरा आहे खास

कॅमेरा बद्दल बोलायचे तर फोन ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप सह येतो. यात 12-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2-माइक्रॉन पिक्सल साइजचा ऐक्शन कॅमेरा सेंसर आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.

सेल्फी साठी हँडसेट मध्ये 12-मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा मिळतो. सेल्फी कॅमेरा पोर्ट्रेट लाइटिंग, शॉट ऑप्टीमाइजेशन, ऑटो स्माइल कॅप्चर, ग्रुप सेल्फी, पोर्ट्रेट मोड आणि सिनेमाग्राफ सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. तसेच डिवाइस मध्ये लँडस्केप मोड विडियो रिकॉर्डिंगचा ऑप्शन पण यूजर्सना देण्यात आला आहे, जरी त्यांनी डिवाइस वर्टिकली वापरला तरी.

कनेक्टिविटी ऑप्शन

फोन मधील कनेक्टिविटी ऑप्शन पाहता यात 4जी एलटीई, वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. तसेच फोन मध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट, जायरोस्कोप, फिंगरप्रिंट, मॅगनेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर पण देण्यात आले आहेत.

किंमत आणि उपलब्धता

कंपनीने Motorola One Vision 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. याची विक्री 30 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वर केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here