Motorola पण घेऊन येत आहे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन, बघा पहिली झलक

स्मार्टफोन टेक्नॉलॉजी वेगाने बदलत आहे. मागील दोन महिन्यांत 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या फोनचे स्वसपण सत्यात आले आहे आणि Samsung, Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँड्सनी जगासमोर 64 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. टोनही ब्रँड्सचे हे स्मार्टफोन भारतीय बाजारात पण सेल साठी उपलब्ध आहेत. 64MP कॅमेऱ्याच्या शर्यतीत आता अजून एक ब्रँडचे नाव जोडले जाणार आहे जे आहे Motorola.

Motorola पण आता टेक मंचावर 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. कंपनीने अजूनतरी अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही पण लीकमधून Motorola चा आगामी 64MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन समोर आला आहे. एका स्पॅनिश वेबसाइटने मोटोरोलाच्या या स्मार्टफोनचा फोटो शेयर कारण्यासोबतच याच्या नावाचा खुलासा पण केला आहे. समोर आले आहे कि Motorola चा हा फोन Moto One Hyper नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.

Moto One Hyper

Motorola चा पहिला पॉप अप कॅमेरा असलेला फोन असेल Moto One Hyper. समोर आलेल्या फोटो मध्ये या फोनची डिजाईन आणि याच्या लुकची माहिती पण मिळाली आहे. हा स्मार्टफोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल ज्यात खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. Moto One Hyper चा पॉप-अप कॅमेरा वरच्या पॅनलच्या डाव्या बाजूने बाहेर येईल ज्यावर सिंगल सेंसर असेल. वाल्यूम रॉकर आणि पावर बटन उजव्या पॅनल वर आहे.

Moto One Hyper च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे आहे. हा रियर कॅमेरा सेटअप पॉप-अप मॅक्नेजिमच्या जागी देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप वर 64MP असे लिहिण्यात आले आहे. फोनच्या डिजाईनच अजून एक खास बात बाब अशी कि यात फ्लॅश लाईट आणि तिसरा सेंसर कॅमेरा सेटअपच्या डावीकडे देण्यात आला आहे. साधारणतः फ्लॅश आणि हा सेंसर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे असतो. फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे ज्याच्या चारही बाजूंना एलईडी लाईटचे सर्कल आहे.

स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता मीडिया रिपोर्ट नुसार हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या आईपीएस डिस्प्ले वर सादर केला जाईल. Motorola Moto One Hyper मध्ये 4 जीबी रॅम मेमरी असल्याचे या रिपोर्ट मध्ये समोर आले आहे. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता पण येईल.

Moto One Hyper च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हा Motorola चा पहिला स्मार्टफोन असेल जो 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार फोन मध्ये एफ/1.8 अपर्चरचा 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. त्याचबरोबर मोटो वन हाइपर एफ/2.2 अपर्चरच्या 8 मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. तसेच हा फोन डेफ्थ सेंसरला पण सपोर्ट करेल. सेल्फी साठी Moto One Hyper मध्ये एफ/2.0 अपर्चरचा 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे रिपोर्ट मध्ये समोर आले आहे.

Motorola Moto One Hyper एंडरॉयड 10 आधारित असेल तसेच क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल. रिपोर्टनुसार हा फोन एनएफसी, ब्लूटूथ 5.0 ला सपोर्ट करेल तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3600एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here