60MP फ्रंट कॅमेऱ्यासह फ्लॅगशिप Moto X40 लाँच; सोबत Moto G53 5G Phone ची देखील एंट्री

मोटोरोलानं चीनमध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत ज्यात Moto X40 आणि Moto G53 5G स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे. X-सीरीजमधील स्मार्टफोन कंपनीचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे तर जी सीरिजचा मॉडेल बजेटयामध्ये सादर करण्यात आला आहे. फ्लॅगशिप Moto X40 मध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC आणि 60MP कॅमेरा असे भन्नाट स्पेक्स मिळतात. तर 10 हजारांच्या रेंजमधील Moto G53 5G स्मार्टफोन 8GB रॅमसह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही हँडसेटचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

मोटो एक्स40 चे स्पेसिफिकेशन्स

Moto X40 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे आणि हा HDR10+ला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 13आधारित MyUI 5.0 वर चालतो. Moto X40 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC देण्यात आला आहे. हा फोन 12GB पर्यंत LPPDR5x RAM आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज ऑप्शनसह येतो. हे देखील वाचा: पावरफुल OnePlus 10T 5G वर 15,000 रुपयांपेक्षा जास्त सूट; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

Moto X40 स्मार्टफोनमध्ये ड्युअल SIM 5G स्मार्टफोन Wi-Fi 6E आणि Bluetooth v5.3ला सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. यात एनर्जी कंजम्शनसाठी MAXE टेक्नॉलॉजी तर तापमान कमी ठेवण्यासाठी 11-लेयर कूलिंग सिस्टम मिळते. Moto X40 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएस सपोर्ट असलेला 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 12-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 60MP चा फोटन्ट कॅमेरा मिळतो.

मोटोरोलाच्या या फोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी आणि 125W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. Motorola चा दावा आहे की हा फोन फक्त 7 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो. Moto X40 स्मार्टफोनमध्ये 15W वायरलेस चार्जिंग आणि 15W रिवर्स चार्जिंग देण्यात आली आहे.

मोटो जी53 5जी चे स्पेसिफिकेशन्स

Moto G53 स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टकोर चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 8GB RAM आणि 128GB storage मिळते, ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा Android 13 आधारित MyUX वर चालतो.

Moto G53 च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP ची सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. तर फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. Moto G53 मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतो. तर सिक्योरिटीसाठी कंपनीनं साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला आहे. हे देखील वाचा: How To Youtube Shorts Videos: पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स

मोटो एक्स40 व मोटो जी 53 प्राइस आणि उपलब्धता

Moto X40 स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 3,399 युआन (सुमारे 40,400 रुपये) आहे, ज्यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. तर 3,699 युआन (सुमारे 44,000 रुपये) मध्ये 8GB रॅम व 256GB स्टोरेज, 3,999 युआन (सुमारे 47,600 रुपये ) मध्ये 12GB व 256GB स्टोरेज मॉडेल आणि 4,299 युआन (सुमारे 51,100 रुपये) मध्ये 12GB रॅम व 512GB स्टोरेज मॉडेल मिळेल. हा फोन Black आणि Blue कलर ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे.

Moto G53 5G स्मार्टफोनचे दोन मॉडेल चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. यातील बेस व्हेरिएंटची किंमत 899 युआन (सुमारे 10,700 रुपये) ठेवण्यात आली आहे, जो 4GB रॅम व 128GB स्टोरेजसह येतो. तर या स्मार्टफोनचा मोठा मॉडेल 1099 युआन (सुमारे 13,100 रुपये) मध्ये येतो, ज्यात 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here