8 हजाराच्या रेंजमध्ये येऊ शकतो POCO Phone, माहिती झाली लीक

POCO X6 Neo भारतात लाँच झाला आहे जो 15,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सेलसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर आता बातमी येत आहे की कंपनी एक लो बजेट मोबाईल फोनवर काम करत आहे जो POCO C61 नावाने लाँच होऊ शकतो. हा पोको सी61 गुगल प्ले सपोर्टेड लिस्टमध्ये पण स्पॉट झाला आहे ज्याचे अनेक स्पेसिफिकेशन समोर आले आहेत.

POCO C61 लिस्टिंगची माहिती

पोको सी61 हा Google Play Supported Devices list मध्ये दिसला आहे. या POCO C61 व्यतिरिक्त POCO C65 आणि POCO C55 फोन पण आहे जो मार्केटमध्ये उपलब्ध झाला आहे. फोनचे मॉडेल नंबर 2312BPC51H सांगण्यात आले आहे तसेच अपकमिंग पोको फोनबद्दल बोलले जात आहे की हा रीब्रँडेड Redmi A3 व्हर्जनच्या रूपामध्ये पण येऊ शकतो. तसेच पोको सी61 ची प्रारंभिक किंमत पण 8 हजारांच्या आसपास असू शकते. पोको सी61 चे स्पेसिफिकेशन व अन्य माहिती अजून आलेली नाही.

Redmi A3 किंमत व स्पेसिफिकेशन

  • किंमत: फोनच्या 3GB + 64GB मॉडेलची किंमत 7,299 रुपये, 4GB + 128GB मॉडेलची किंमत 8,299 रुपये तसेच सर्वात मोठ्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 9,299 रुपये आहे.
  • डिस्प्ले : यात 6.71-इंचाची (1650 x 720 पिक्सल) HD+ IPS LCD स्क्रीन आहे, जी 90Hz रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह आहे.
  • प्रोसेसर: फोनमध्ये 2.2 GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो G36 12nm प्रोसेसर आहे, जो की IMG PowerVR GE8320 @ 680MHz GPU सह येतो.
  • ओएस: फोनला कंपनीने Android 13 (गो व्हर्जन) सह सादर केले आहे जो की ड्युअल सिम (नॅनो + नॅनो + मायक्रोएसडी) सह आहे. अँड्रॉइड ‘गो’ असल्यामुळे हा फोन कमी रॅमवर सहजतेने प्रक्रिया करू शकतो.
  • कॅमेरा: डिव्हाईसमध्ये एफ/2.0 अपर्चर एलईडी फ्लॅशसह 8MP चा रिअर कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, व्हिडिओ कॉलिंग व सेल्फीसाठी 5MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
  • कनेक्टिव्हिटी : ड्युअल 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस + ग्लोनास, यूएसबी टाइप-सी पोर्ट
  • बॅटरी: फोन 10W चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी आहे.
  • इतर: हँडसेटमध्ये 3.5 मिमी ऑडियो जॅक, एफएम रेडियो आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here