भारतात लॉन्च झाला 5 कॅमेरा असेलेला एलजी वी40 थिंक, अमेझॉन वर होत आहे विक्री

एलजी ने अखेरीस आपला फ्लॅगशिप एलजी वी40 थिंक स्मार्टफोन भारतात लान्च केला आहे. या हँडसेट मध्ये पाच कॅमेरे आहेत, ज्यातील तीन मागे आणि दोन फ्रंटला देण्यात आले आहेत. एलजी ने हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केला होता जो आता भारतात अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून विकत घेता येईल.

एलजी वी40 थिंक ची किंमत
एलजी वी40 थिंक कंपनी ने भारतात 49,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. डिवाइस मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज आहे. स्मार्टफोन तुम्ही अमेझॉन इंडिया वर विकत घेऊ शकता. डिवाइस मोरक्कन ब्लू आणि प्लेटिनम ग्रे कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. एलजी च्या या डिवाइस सोबत 12 महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआई, फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट, 5,000 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंट आणि अमेझॉन पे बॅलेन्स वर 1,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

एलजी वी40 थिंक चे स्पेसिफिकेशन्स
एलजी वी40 थिंक चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 3,120 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा क्यूएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एलजी यूआई सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे सोबतच हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट 845 वर चालतो.

हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि ​डुअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.5 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/1.9 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा वाइड एंगल सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे क्रमश: एफ/1.9 अपर्चर तसेच एफ/2.2 अपर्चर सह येतात. एआई टेक्नोलॉजी असलेल्या वी40 थिंक चा कॅमेरा सेटअप मध्ये पण एआई टेक्नोलॉजी आहे त्याचबरोबर यात आर्कषक फिल्टर्स व मोड्स आहेत

एलजी वी40 थिंक च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. हा फोन आईपी68 रेटिड ज्यामुळे हा पाणी आणि धुळ यापासून वाचतो. बेेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोन मध्ये 3300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here