4जीबी रॅम आणि 6.1-इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एलजी क्यू9 वन, पडल्यावर पण तुटणार नाही हा मिलिट्री ग्रेड फोन

एलजी बद्दल अलीकडेच बातमी आली होती कि कंपनी एकीकडे आपल्या पहिल्या 5जी फोन आणि वी40 थिंक वर काम करत आहे तसेच या दोन्ही फोन्स सोबत एका लो बजेट स्मार्टफोन के12प्लस पण लवकरच सादर करण्याची तयारी करत आहे. एलजी 24 फेब्रवारीला एमडब्ल्यूसी च्या मंचावरून आपले नवीन स्मार्टफोन्स सादर करू शकते. पण एमडब्ल्यूसी च्या आधीच कंपनी ने आपला अजून एक स्मार्टफोन एलजी क्यू9 वन ऑफिशियल केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन कोरियन बाजारात आणला आहे जो येत्या काही दिवसांत इतर मार्केट्स मध्ये येईल.

एलजी क्यू9 वन च्या नावावरून समजते कि कंपनीने आपला हा फोन एंडरॉयड वन वर्जन वर सादर केला आहे. एंडरॉयड वन बेस्ड असल्यामुळे हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे. तसेच जवळपास दोन वर्षे हा फोन एंडरॉयडच्या प्रत्येक नवीन वर्जन वर अपडेट होऊ शकेल. म्हणजे एलजी क्यू9 वन एंडरॉयड 10 क्यू रोल आउट होताच या फोनला नवीन एंडरॉयड ओएस अपडेट मिळेल. चला एक नजर टाकूया या फोनच्या स्पेसिफिकेशन्स वर :

शाओमी मी 9 झाला सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट, या शानदार फीचर्सची मिळाली माहिती

डिजाईन व डिस्प्ले
एलजी क्यू9 वन कंपनी द्वारा 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. या फोन मध्ये 6.1-इंचाचा मोठा फुलविजन सुपर ब्राइट आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे जो 3120 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वर रेग्यूलर नॉच देण्यात आली आहे. क्यू9 वन च्या बॅक पॅनल वर मधोमध सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईट ने सुसज्ज आहे. कॅमेरा सेटअप खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे.

एलजी क्यू9 वन आईपी 68 रेटिड आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळी पासून वाचतो. कंपनी म्हणते कि त्यांनी क्यू9 वन मिलिट्री लेवलची मजबूती दिली आहे. म्हणजे हा फोन इतर स्मार्टफोन्सपेक्षा जास्त स्ट्रांग असेल तसेच पडल्यावर किंवा कोणत्याही वस्तूशी धडकल्यावर पण हा तुटणार नाही.

रॅम व प्रोसेसर
एलजी क्यू9 वन कंपनी द्वारा 4जीबी रॅम वर सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 2टीबी पर्यंत वाढवता येते. क्यू9 वन स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 835 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 540 जीपीयू आहे.

व्हॅलेंटाइन डे ची भेट, ऍप्पल आईफोन एक्सआर वर कंपनी देत आहे मोठी सूट

कॅमेरा सेटअप
एलजी क्यू9 वन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/1.6 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/1.9 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. एलजी ने आपल्या दोन्ही कॅमेरा सेटअप मध्ये वाईड एंगल लेंस दिली आहे.

कनेक्टिविटी आणि बॅटरी
एलजी क्यू9 वन बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असेलेली 3000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

एलजी क्यू9 वन मोरोक्कन ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. कोरिया मध्ये या फोनची किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 37,900 रुपये आहे. हा फोन भारतात कधी येईल याबद्दल काही सांगता येत नाही पण अशा आहे भारतात या फोनची किंमत कोरियापेक्षा कमी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here