6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला एलजी कँडी, बघा या स्वस्त फोनचे शानदार फीचर

एलजी ने या आठवड्यात भारतात एलजी क्यू7 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन 15,990 रुपयांमध्ये आला आहे जो 1 सप्टेंबर पासून आॅनलाईन व आॅफलाईन स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल. एलजी क्यू7 च्या 2 दिवसांनंतर कंपनी ने अजून एक स्वस्त स्मार्टफोन एलजी कँडी इंडियन मार्केट मध्ये सादर केला आहे. एलजी ने हा नवीन स्मार्टफोन 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 1 सप्टेंबर पासून बाजारात सेल साठी उपलब्ध होईल.

एलजी कँडी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या एचडी आॅनसेल डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. एलजी चा हा फोन बेजल लेस म्हणता येणार नाही पण फ्रंट पॅनल वर कंपनी ने कोणतेही फिजिकल बटन दिले नाही. हा स्मार्टफोन एंडरॉयड 7.1.2 नुगट आधारित आहे जो 1.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर चालतो. कंपनी ने अजूनतरी चिपसेट ची माहिती दिली नाही.

एलजी कँडी मध्ये 2जीबी रॅम आहे. या फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 32जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.

एलजी कँडी 4जी एलटीई ला सपोर्ट करतो तसेच यात वाईफाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. एलजी कँडी ब्लू, सिल्वर आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कंपनी या फोन चे 3 बॅक कवर पण देत आहे जे यूजर आपल्या आवडी नुसार बदलू शकतात. हा फोन येत्या 1 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here