Home Featured लेनोवोचा ​ट्रिपल रियर कॅमेरा असलेला फोन झेड5एस पुढल्या महिन्यात होऊ शकतो लॉन्च, मीडिया इन्वाईट झाला लीक

लेनोवोचा ​ट्रिपल रियर कॅमेरा असलेला फोन झेड5एस पुढल्या महिन्यात होऊ शकतो लॉन्च, मीडिया इन्वाईट झाला लीक

लेनोवो बद्दल नुकतीच बातमी आली होती ज्यात कंपनीच्या एक आगामी स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंग मध्ये फोनचे नाव समजले नव्हते पण फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. तर आज एका ताजा लीक मध्ये लेनोवोच्या या फोनचा लॉन्च ईवेंट टीजर समोर आला आहे. या लीक मध्ये समजले आहे कि टेना वर लिस्ट झालेला हा स्मार्टफोन लेनोवो झेड5एस आहे आणि कंपनी हा स्मार्टफोन पुढल्या महिन्यातच टेक मंचावर सादर करेल.

लेनोवो फोनचा लॉन्च टीजर एका टेक ब्लॉगर ने आपल्या ट्वीटर हँडल वरून शेयर केला आहे. टेना वर एल78071 मॉडेल नंबर सह लिस्ट हुआ स्मार्टफोन लेनोवो झेड5एस नावाने टेक बाजारात लॉन्च होईल हे पण या लीक मध्ये स्पष्ट झाले आहे. ट्वीटर वर लेनोवोच्या या फोनच्या मीडिया लॉन्च ईवेंटची टीजर ईमेज शेयर करण्यात आली आहे. या टीजर ईमेज मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे तसेच फोटोच्या खाली ’12’ म्हणजे बाराव्या महिन्याचा उल्लेख आहे. हि ईमेज इशारा करत आहे कि लेनोवो झेड5एस डिसेंबर मध्ये लॉन्च केला जाईल.

लेनोवो झेड5एस च्या या टीजर ईमेज मध्ये फोन कर्व्ड ऐज असलेला दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर ‘ओ’ शेप वॉटरड्रॉप नॉच पण या फोटो मध्ये दिसत आहे. या ‘ओ’ शेप मधून प्रकाश येत आहे त्यामुळे असे वाटते कि लेनोवो झेड5एस मध्ये रांउड शेप वाला सेल्फी कॅमेरा दिला जाईल. या ओ शेप व्यतिरिक्त फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही बेजल्स दिसत नाहीत. तसेच फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचे पण समजले आहे.

टेनाची लिस्टिंग पाहता लेनोवो झेड5एस 6.2-इंचाच्या डिस्प्ले सह येणार असल्याचे सांगण्यात आले होते तसेच फोन चे डायमेंशन 156.7×74.5×7.8एमएम होते. टेनाच्या लिस्टिंग मध्ये लेनोवो झेड5एस डुअल सिम व ​डुअल स्टॅण्डबाय फीचर सह येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच फोन मध्ये 4जी वोएलटीई सोबत 3210 एमएएच ची बॅटरी देण्यात आली तेच हे पण टेना लिस्टिंग वरून समजले. लॉन्च ईवेंट ची टीजर ईमेज लीक झाल्यानंतर आशा आहे कि लेनोवो लवकरच झेड5एस ची आॅफिशियल घोषणा करेल.