Home टॉप कलेक्शन Jio Airtel 5G Launch: लाँच डेट, 5G SIM, 5G प्लॅन, 5G स्पीड, 5G बँड

Jio Airtel 5G Launch: लाँच डेट, 5G SIM, 5G प्लॅन, 5G स्पीड, 5G बँड

Jio आणि Airtel नं आपल्या 5G सर्व्हिसची तयारी सुरु केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात या कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रमसाठी जोरदार बोली लावली आणि त्यामुळे देशातील सर्व सर्कल्समध्ये 5G सर्व्हिस लाँच करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर या दोन्ही कंपन्यांनी या महिन्यापासून 5G सेवा लाँच करण्याची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की कशी असेल जियो आणि एयरटेलची 5G सर्व्हिस. कसे असतील प्लॅन आणि कधी मिळतील सिम. या प्रश्नांची उत्तरं आम्ही पुढे देणार आहोत.

Jio 5G सर्व्हिस

कधी लाँच होईल Jio 5G सर्व्हिस

अलीकडेच Reliance Jio चे अध्यक्ष Akash Mukesh Ambani यांनी प्रेस रिलीजच्या माध्यमातून घोषणा केली होती की जियो भारतात आपली 5G सर्व्हिस लाँच करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करेल. त्यामुळे बोलले जात आहे की कंपनी आगामी काही दिवसांमध्ये आपली 5G सर्व्हिस सादर करेल. कंपनी सुरुवात मेट्रो शहरांपासून करणार आहे आणि नंतर देशात रोल आउट करण्यात येईल.

कसे असतील Jio 5G रिचार्ज प्लॅन

स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स Jio नं सर्वात जास्त पैसे खर्च केले आहेत. कंपनीनं यासाठी 88,078 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे सुरुवातीला 5G सर्व्हिस महाग आहे, अशी शक्यता आहे. 4जी च्या तुलनेत ही सेवा दुप्पट महाग असू शकते.

कधी मिळेल JIO 5G SIM

तसं पाहता कंपनी आपली 5G सर्व्हिस काही शहरांपासून सुरु करेल. परंतु आशा आहे की या महिन्यात देशात Jio चे 5G SIM मिळण्यास सुरुवात होईल. हे सिम जियो स्टोर व्यतिरिक्त अधिकृत जियो स्टोरवर देखील मिळतील.

किती असेल Jio 5G Speed

तसं पाहता 5G टेस्टिंग दरम्यान कंपनीनं 1GBPS पर्यंतचा डेटा स्पीड मिळवला होता. परंतु काही महिन्यांपूर्वी 91मोबाइल्सनं Jio ऑफिसमधील एक स्क्रीन शॉट लीक केला होता ज्यात कंपनी 400 MBPS पर्यंतचा स्पीड मिळवत होती. त्यामुळे असं म्हणता येईल की सुरुवातीला 5G अंतगर्त इतका स्पीड युजर्सना मिळू शकतो. हा स्पीड 4जीच्या तुलनेत 10 पट जास्त असेल.

कोणत्या Band वर मिळेल Jio 5G सर्व्हिस

5G स्पेक्ट्रम लिलावात सरकारकडून एकूण 72097.85MHz स्पेक्ट्रम बँड लिलावासाठी ठेवण्यात आले होते आणि या ऑक्शनमध्ये कंपनीनं 700MHz, 800MHz, 1800MHz, 3300MHz मिड फ्रीक्वेंसी बँड्स तसेच 26GHZ हाय फ्रीक्वेंसी बँड मिळवले आहेत. सर्वात खास बाब म्हणजे कंपनीनं 700MHz बँड सर्व 22 सर्कल्समध्ये मिळवला आहे. त्यामुळे आशा आहे की या स्पेक्ट्रम बँडवर कंपनीची 5G सर्व्हिस लाँच होईल.

स्वदेशी आणि किफायतशीर

Jio नं आधी देखील सांगलीत आहे की ते 5G साठी स्वदेशी सर्व्हिस लाँच करेल. अर्थात भारतात तयार 5G सर्व्हिस असल्यामुळे इतरांच्या तुलनेत किफायतशीर असेल.

Airtel 5G सर्व्हिस

कधी लाँच होईल Airtel 5G सर्व्हिस

Airtel नं देखील एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून माहिती दिली आहे की कंपनी लवकरच आपली 5G सर्व्हिस लाँच करेल. महत्वाचे म्हणजे जियोला टक्कर देण्यासाठी कंपनी या महिन्यात आपली 5G सर्व्हिस लाँच करू शकते.

Airtel 5G रिचार्ज प्लॅन

कंपनीनं आधीच सांगितलं आहे की सेवा आता महाग होईल आणि ARPU वाढवला जाईल. तसेच 5G स्पेक्ट्रम लिलावात कंपनीनं 43,084 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे 5G सर्व्हिस महाग असेल, हे स्पष्ट झालं आहे.

कधी मिळेल Airtel 5G SIM

Jio प्रमाणे Airtel देखील आपली 5G सर्व्हिस संपूर्ण देशात एकाच वेळी लाँच करणार नाही. तर कंपनी काही शहरांपासून याची सुरुवात करणार आहे परंतु 5G SIM लवकरच संपूर्ण देशात उपलब्ध होतील.

किती असेल Airtel 5G चा स्पीड

Airtel नं दावा केला आहे की कंपनी 4जीच्या तुलनेत 100 पट चांगला अनुभव देणार आहे. टेस्टिंग दरम्यान कंपनीनं 1 जीबीपीएस पेक्षा जास्त स्पीड मिळवला आहे परंतु युजर्सना 400 आणि 500 एमबीपीएस पर्यंतचा मॅक्स स्पीड मिळेल.

कोणत्या Band वर मिळेल Airtel 5G सर्व्हिस

Airtel नं 1800, 2100 आणि 2300MHz बँडसह 3.5 GHz बँडसह 26 गीगाहर्ट्ज स्पेक्ट्रमवर पैसे खर्च केले आहेत. या बँड्सची खूबी आहे की हे कमी खर्चात 100 पट जास्त चांगली कव्हरेज देऊ शकतात.