फक्त 7,600 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000mAh आणि 6.6-इंच डिस्प्ले असलेला हा फोन, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Infinix ने अलीकडेच भारतीय बाजारात Smart 4 Plus लॉन्च केला होता. आता कंपनीने अजून एक नवीन स्मार्टफोन Infinix Smart 5 लॉन्च केला आहे. लॉन्चच्या काही दिवस आहि हा फोन Google Play Console वर लिस्ट झाला होता, जिथे याच्या अनेक फीचर्सची माहिती देण्यात आली होती. आता हा नायजेरिया मध्ये अधिकृतपणे सादर केला गेला आहे. तसेच एका टेक वेबसाइटने माहिती दिली आहे कि डिवाइस अधिकृत इंडियन वेबसाइट वर पण लिस्ट झाला आहे, ज्यावरून अंदाज लावला जात आहे कि हँडसेट लवकरच इंडियन मार्केट मध्ये येईल.

Mysmartprice च्या बातमीनुसार Infinix Smart 5 इनफिनिक्स इंडियाच्या वेबसाइट वर 3GB रॅम + 64GB स्टोरेज सह दिसला आहे. फोन नायजेरिया मध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे, ज्याची किंमत Nigeria naira 39500 (जवळपास 7,600 रुपये) आहे.

Infinix Smart 5 चे स्पेसिफिकेशन्स

Infinix Smart 5 मध्ये HD + रेजोल्यूशन सह 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. Infinix ने Smart 5 च्या प्रोसेसर मॉडेलचा खुलासा केला नाही पण अधिकृत वेबसाइटनुसार फोन मध्ये 1.8GHz बेस फ्रीक्वेंसी सह ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 2GB रॅम आणि 32GB ची स्टोरेज आहे. इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येते.

सॉफ्टवेअर पाहता Infinix Smart 5 Android 10 Go वर चालतो. तसेच फोटोग्राफीसाठी फोन मध्ये फ्रंटला वी-शेप नॉच देण्यात आला आहे, ज्यात 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरे आहेत, ज्यातील एक 13MP चा प्राइमरी सेंसर आणि दोन 2MP चे कॅमेरे आहेत. मागील प्राइमरी कॅमेरा 30 फ्रेम प्रति सेकंड सह फुल एचडी वीडियो रेकॉर्ड करू शकतो.

Infinix Smart 5 चा स्टॅन्डआउट फीचर असा आहे कि हा फोन 5000mAh बॅटरी सह येतो. पण फोन मध्ये फक्त 10W चार्जिंग स्पीड आहे आणि ती पण माइक्रोयूएसबी पोर्टच्या माध्यमातून. Infinix Smart 5 मध्ये 4 जी सपोर्ट सह डुअल-सिम कनेक्टिविटी, डुअल-बँड वाई-फाई एसी, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक आहे. Infinix Smart 5 मध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर पण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here