साल 2018 मध्ये भारतीयांनी खरेदी केले 1423 लाख स्मार्टफोन (14,23,00,000), शाओमीने पुन्हा प्रथम

इंडियन मोबाईल मार्केट संपूर्ण जगात वेगाने वाढणारा मार्केट आहे. ​​काही दिवसांपूर्वीच रिसर्च फर्म काउंटरप्वाइंट ने आपला रिपोर्ट शेयर केला होता ज्यात साल 2017 आणि साल 2018 का चौथ्या तिमाहीचे स्मार्टफोन शिपमेंटचे आकडे शेयर केले गेले होते. इंडियन स्मार्टफोन मध्ये इतकी वेगवान वाढ झाली आहे कि अमेरिका व चीन सारखे देश पण मागे पडत आहेत. तसेच आता दुसऱ्या रिसर्च फर्म आईडीसी ने पण भारतीय मोबाईल बाजाराचा नवा रिपोर्ट शेयर केला आहे. या रिपोर्टचे आकडे पण धक्कादायक आहेत ज्यात सांगण्यात आले आहे कि साल 2017 पेक्षा साल 2018 मध्ये भारतीय मोबाईल बाजारात 14.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. हैराणीची बाब म्हणजे याचकाळात इतर देशांच्या बाजारांत मोबाईल शिपमेंट मध्ये घसरण होत असताना आपल्या देशाचा स्मार्टफोन बाजार सतत वाढत आहे.

मोबाईल बाजाराने केला नवा रेकॉर्ड
आईडीसी च्या रिपोर्टनुसार साल 2018 मध्ये इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये 142.3 मिलियन मोबाईल यूनिटची शिपमेंट झाली आहे. हि शिपमेंट साल 2017 च्या तुलनेत 14.5 टक्के जास्त आहे. वर्ष 2018 मध्ये सर्वात जास्त स्मार्टफोन्सचा सेल वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत झाला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये भारतीयांनी सर्वाधिक स्मार्टफोन विकत घेतले आहेत. विशेष म्हणजे याकाळात इतके जास्त स्मार्टफोन विकेल गेले कि शेवटच्या क्वॉटर मध्ये भरपूर विक्री होऊनही तिसऱ्या तिमाहीपेक्षा शिपमेंट 15.1 टक्के कमी झाली आहे.

कोणत्या कंपनीने जिंकली मनं
भारतीय स्मार्टफोन बाजारात सर्वात जास्त शाओमीचे स्मार्टफोन्स लोकप्रिय होते. साल 2018 मध्ये सर्वात पुढे जात इंडियन स्मार्टफोनचा 28.9 टक्के हिस्सा शाओमी ब्रँडने कमवला आहे. या यादीत सॅमसंग दुसऱ्या नंबर आहे, 22.4 टक्के मार्केट शेयर सह. तसेच 10 टक्के मार्केट शेयर घेत वीवो तिसऱ्या आणि 7.2 टक्के मार्केट शेयर सह ओपो चौथ्या नंबर वर आहे. साल 2018 मध्ये शाओमीचे 41.1 मिलियन पेक्षा जास्त स्मार्टफोन विकले गेले आहेत.

सॅमसंग ने केली गॅलेक्सी नोट 9 आणि एस9+ च्या किंमती कमी, ​मिळेल 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा

सर्वात जास्त विकले गेले बजेट फोन
वर्षभरात वेगवेगळ्या ब्रँड्सनी कमी किंमतीपासून हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केले. पण भारतीयांना सर्वात जास्त लो बजेट सेग्मेंटच आवडला आहे. ​आईडीसी च्या रिपोर्टनुसार भारतीयांनी पहिली पसंती 7,000 रुपयांपासून 14,000 रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोन्सना दिली आहे. सरासरी काढायची झाल्यास भारतीय स्मार्टफोन यूजर्सनी 11,000 रुपये किंमत असलेलं स्मार्टफोन सर्वात जास्त विकत घेतले आहेत.

एक्सक्लूसिव : 6जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 845 प्रोसेसर आणि एंडरॉयड 9 पाई सह लॉन्च होईल नोकिया 9 स्मार्टफोन

जियोफोनचा जलवा आहे कायम
फीचर फोन बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास साल 2017 च्या तुलनेत वर्ष 2018 मध्ये भारताचा फीचर फोन बाजार 10.6 टक्क्यांनी वाढला आहे. इंडियन फीचर फोन मार्केट मध्ये सर्व ब्रॅण्ड्सनी मिळून 181.3 मि​लियन यूनिट विकले आहेत. देशातील फीचर फोन बाजारात सर्वात मोठा वाटा जियोफोनच्या नावे आहे. फीचर फोन बाजाराच्या एकूण शेयर्स पैकी 36.1 टक्के हिस्सा जियोफोन आणि जियोफोन 2 च्या नावे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here