4000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा, 6.53 इंचाचा डिस्प्ले आणि 2 जीबी रॅम सह लॉन्च झाला HTC चा लो बजेट फोन Wildfire R70

HTC ने गेल्यावर्षी ‘वाइल्ड फायर’ सीरीज अंतर्गत Wildfire X स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन लो बजेट मध्ये आला होता जो लोकांना आवडला होता. तसेच आता आपल्या यूजर्ससाठी एचटीसी ने या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन डिवाईस HTC Wildfire R70 भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन पण मोठ्या बॅटरी सह ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. एचटीसी ने सध्या वाइल्डफायर आर70 ची किंमत सांगितली नाही पण येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

HTC Wildfire R70

एचटीसी वाइल्डफायर आर70 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या आईपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्ले सपोर्ट करतो. फोनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच आहे. तसेच HTC Wildfire R70 च्या लोवर पॅनल वर बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Black Shark 3 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, 12जीबी रॅम आणि 65वॉट चार्जिंग सपोर्ट सह असेल स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट

HTC Wildfire R70 कंपनीच्या वेबसाइट वर 2 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते. एचटीसी वाइल्डफायर आर70 एंडरॉयड 9 पाई आधारित एचटीसी सेंस यूआई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 16एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हीलियो पी23 चिपसेट वर चालतो.

वाइल्डफायर आर70 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.75 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्यासोबत एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधीच समोर आली OPPO Reno 3 Pro च्या कॅमेऱ्याची माहिती, फोन मध्ये असेल 2 सेल्फी आणि 4 रियर कॅमेरा

HTC Wildfire R70 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन मार्केट मध्ये Aurora Blue आणि Nigh Black कलर मध्ये आला आहे ज्याची किंमत पण लवकरच समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here